KAILASA Library/वेदनेपासून आनंदापर्यंत (Vednepasun Anandaparyant)/वेदना काय आहे?Sign in
वेदनेपासून आनंदापर्यंत (Vednepasun Anandaparyant)

वेदना काय आहे?

This text was machine-transcribed from the printed book and may contain errors. Select the words and choose “Report a mistake”.

चला, आपण या विषयावर खोलात जाऊन शोध घेऊया. वेदना शारीरिक, मानसिक वा भावनात्मक असू शकते. या सर्वात शारीरिक वेदनेची चिंता सर्वात कमी आहे.

एका प्रकारे ही शरीराची मूलभूत गरजही आहे. जरा विचार करा, जर आपल्याला कोणतीच वेदना होत नसेल तर आपण आपला चेहरा व हात-पायसुद्धा तसेच बनवू शकतो जसे आपण केस बनवितो! आपण निश्चितच आजच्या किशोरवयीन मुलांसमोर असेच आणू शकलो नसतो! यातील विनोद बाजूला ठेवून, वेदना हे शारीरिक ज्ञानाचे प्रतीक आहे. वेदना मनुष्याच्या अस्तित्वास समग्र बनविते.

आपल्या विश्वासाच्या विरुद्ध, आपल्यातील बहुतांश जण आपल्या संपूर्ण शरीरासह जगत नसतात. आपण खालील भागांची उपेक्षा करून वरील भागांमध्ये रहात असतो. माझे म्हणणे नीट समजण्यासाठी, हा प्रयत्न करा : आपले डोळे बंद करून आपल्या अस्तित्वाची आपण कल्पना करा. आपले नाव घ्या. तुमच्या शरीराचे कोणते अंग तुमच्या लक्षात येते? निश्चित रूपाने तुमचा चेहरा व हात, निश्चितच तुमच्या शरीरातील खालील अंग नाही. हे

Paramahamsa Nithyananda smiling under an umbrella

दाखविते की, आपण प्रत्येक पेशीमध्ये, प्रत्येक हात-पायामध्ये पूर्णपणे जीवित नाही. इतकेच नव्हे तर आपल्या मनामध्येही आपण हा फरक करतो. शरीराचा वरील भाग मालक व खालील भाग नोकर आहे. जेव्हा तुम्ही हा फरक बनवता, नकळतच, तुमची शक्ती व जीवनशक्ती शरीराच्या ज्या अवयवांवर आपण लक्ष केंद्रीत करतो त्यामध्ये विभागून राहते. तुमच्या गालांना स्पर्श करा. एक संवेदनशील, जीविताची जाणीव होत नाही का? आता आपल्या पायांना स्पर्श करा. अशाप्रकारचाच तुम्हाला अनुभव होतो का? लक्ष द्या की, आपण आपल्या गालांमध्ये जेवढे जीवित आहोत तितके आपल्या पायांमध्ये नाही. असे का बरे आहे? वास्तवकि विश्वास ठेवणे कठीण आहे. याचे कारण आहे शरीराच्या या भागावर तुमच्या लक्षाचा अभाव असतो.