KAILASA Library/वेदनेपासून आनंदापर्यंत (Vednepasun Anandaparyant)/मन वेदनेस नियंत्रित करू शकतो का?Sign in
वेदनेपासून आनंदापर्यंत (Vednepasun Anandaparyant)

मन वेदनेस नियंत्रित करू शकतो का?

This text was machine-transcribed from the printed book and may contain errors. Select the words and choose “Report a mistake”.

भावनात्मक व मानसिक स्तरावर, वेदना ही कोणत्या ना कोणत्या स्वरूपात निर्णयाचे परिणाम आहे. वर्तमान क्षणाच्या विरोधाच्या कारणाने नेहमी वेदनेचा जन्म होतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जेवढ्या वेळी तुम्हाला वेदनेची जाणीव होईल तितक्या वेळी ती आपल्या मागे अंश सोडून जाते. ती वेदनेची जाणीव तुमच्या शरीरात राहून जाते. हळूहळू ही गोळा झालेली वेदना तुमच्या सर्व बाजूंना नकारात्मक ऊर्जा तयार करते, जिला आपण शारीरिक वेदना म्हणतो. ही शारीरिक वेदना आपल्या अधिकांश वेदनांच्या प्रकारांकरिता जबाबदार आहे व नियंत्रित करीत असते.

संशोधनाअंती दिसून आले आहे की, भावनात्मक असंतुलन भौतिक शरीरात खोलवर गडबड निर्माण करू शकते. उदाहरण द्यायचे तर लैंगिक इच्छेचे दमन केल्याने पाठदुखी होऊ शकते किंवा खांद्यांवर अधिक जबाबदाऱ्यांमुळे खांदेदुखी होऊ शकते.

गर्दीने भरलेल्या बसमध्ये तुम्ही विविध प्रकारच्या माणसांबरोबर प्रवास करता. पण आपला अंतरात्मा त्यांना स्पर्श करणार नाही - तुमचे मन, तुमची चेतना या गोष्टीची परवानगी देत नाही. याबद्दल्यात आपला अंतरात्मा आपल्या आतच संकुचित पावतो.

वेदना नेहमी
वर्तमानाचा प्रतिरोध
केल्याने निर्माण होते.

Paramahamsa Nithyananda

एक

छोटीशी

गोष्ट

कोलकात्यामध्ये दोन आश्रम होते ज्यांच्या अध्यक्षांमधील संबंध काही ठीक नव्हते. एके दिवशी एका लोकमान्य व्यक्तीचा प्रतिनिधी यांपैकी एका अध्यक्षाकडे आला व त्यांना आपल्यासमवेत दुसरा आश्रम दाखविण्यास सांगू लागला. तो अध्यक्ष खूप त्रासलेला होता - तो नकारही देऊ शकत नव्हता की जाऊ इच्छित नव्हता. अचानकच त्या अध्यक्षांना मोठा ताप आला आणि त्यांचे आपले स्थान सोडून जाणेही टळले! मी हे आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे. तो प्रतिनिधी जातो न जातो तोच त्यांचा तापही ठीक झाला. आपण सर्वांनी सोमवारच्या सकाळच्या सुस्तीचा अनुभव घेतला नाही काय? इतकेच navhe, तर लहान मुलेही आपल्याला नावडीचा काम सांगितले गेले की आजारीपणाची लक्षणे दाखवू लागतात - जसे शाळेत जाणे! मेंदू व शरीरापासून जे आपल्याला भिन्न दिशांना खेचू लागतात. यामुळेच तुम्ही स्वतःच स्वतःशी सहजपणे नाही आहात. ही असुविधाच आजार म्हणून ओळखली जाते.

एके दिवशी, एका परंपरावादी कुटुंबातील एक सुंदर युवक आमच्या निरामय केंद्रामध्ये आला. त्याची तक्रार होती आकस्मिक अंधत्व! त्याचे पालक रडू लागले आणि मला सांगितले की, मुलाचे आरोग्य खूपच चांगले आहे आणि तो एका आठवड्यापूर्वीच अंध झाला आहे. सर्व वैद्यकीय चाचण्यांमध्ये त्याची दृष्टी त्रुटीरहित सिद्ध झाली आहे - पण तो पाहू शकत नाही! त्याच्या ऊर्जेचे काळजीपूर्वक निरिक्षण केल्यानंतर मी काही वेळ त्याच्याशी एकांतात व्यतित करण्याचे ठरविले. त्याच्याशी एकांतात बोलण्याची परवानगी मिळताच त्याने आपल्या सर्व चिंता माझ्यासमोर ठेवल्या. त्याने सांगितले की त्याचे एका मुलीवर प्रेम जडले आहे आणि त्याच्या आईवडिलांनी जबरदस्तीने त्या मुलीशी भेट घेण्यास त्याला विरोध केला आहे. मला त्वरित समस्येचे मूळ कारण समजले. त्या मुलाला मी त्या मुलीचा एक फोटो मिळविण्यास सांगितले आणि पुढील तीन दिवस सतत त्या फोटोवर लक्ष केंद्रित करायलाही सांगितले. त्याचे आईवडिल माझ्या या रूढीमुक्त इलाजाने आणि तेसुद्धा एका आध्यात्मिक व्यक्तीकडून मिळालेल्या इलाजाने आश्चर्यचकित झाले ! पण ते तंत्र कामी आले, तीन दिवसांतच मुलाची दृष्टी पूर्णपणे पूर्ववत झाली.

Paramahamsa Nithyananda

© 2007 Paramahamsa Nithyananda. All Rights Reserved