KAILASA Library/वेदनेपासून आनंदापर्यंत (Vednepasun Anandaparyant)/का असे झाले?Sign in
वेदनेपासून आनंदापर्यंत (Vednepasun Anandaparyant)

का असे झाले?

This text was machine-transcribed from the printed book and may contain errors. Select the words and choose “Report a mistake”.

जेव्हा त्या मुलीला, जिला तो सर्वात अधिक पाहू इच्छित होता, तिलाच न बघण्यास त्या मुलाला मनाई केली गेली तेव्हा त्याच्या अवचेतना मेंदूने निर्णय घेतला की तो आता काहीही पाहणार नाही. त्याचे अंधत्व गूढमनोविज्ञानाशी संबंधित होते. मस्तकची इंद्रियांवर काय प्रचंड शक्ती आहे! मस्तकच सर्व काही आहे!

भगवत् पुराणात उल्लेखित आहे : कृष्ण व राधेचा जन्म काही क्षणांच्या फरकाने झाला. राधा सर्व प्रकारे एक साधारण मुलगी होती - फक्त ती आपले डोळे उघडू शकत नव्हती. काही दिवसांनंतर, राधेची आई कृष्णाच्या घरी बाळ कृष्णाला बघायला गेली. तिने आपल्या नवजात मुलीलाही बरोबर घेतले. ज्या क्षणी राधा कृष्णाच्या समोर आली तिने सर्वात आधी कृष्णाला पाहिले. नंतर, मैत्रिणीने विचारल्यावर राधेने सांगितले, त्याच्याशिवाय तिथे पहायला होते तरी काय? मी कृष्णाकरिताच जन्म घेतला आहे. याकरिता डोळे उघडण्यासाठी मी कृष्णाच्या उपस्थितीची वाट बघत होते. ही केवळ एक गोष्ट असू शकते, मात्र शरीरावर मस्तकच्या प्रचंड शक्तीचे हे उदाहरण आहे. वास्तविक, आपण असे बोलू शकतो की, शरीराद्वारे मेंदूला लिहिलेले मागणीपत्र आहे वेदना - ज्यात सांगितले आहे की

कृपया माझ्याकडेही थोडे लक्ष असू द्या! कारण तुमचे लक्ष ही तुमची ऊर्जा आहे. ज्या दिशेला तुम्ही लक्ष वळविता त्या दिशेला तुमची ऊर्जाही फिरते. तुम्ही तुमच्याकडे वेदनेला आमंत्रित करता! जसे सन्माननीय पाहुण्यांना आपण घरी बोलावतो तसे सर्व वेदनांना आपणच बोलावतो हे सांगितले तर कित्येक जणांना विश्वास होणार नाही. हेच खरे आहे.

Paramahamsa Nithyananda performing aarti with a lamp

एक

छोटीशी

गोष्ट

नीती मुदालियर एका भोजनालयात गेला आणि भरपूर प्रमाणात खाऊ लागला. गरम इडली, डोसा व जिलेब्यांनी भरलेल्या थाळी त्याच्या टेबलावर येऊ लागल्या. तो पोटभर जेवला. पोटभर जेवल्यानंतर त्याने वेटरना इशारा केला की त्यांनी आणखी जेवण आणू नये. वेटर थोड्या वेळाने एका लहान कागद घेऊन आला.

हे काय आहे? नितीने न कळल्याचा भाव आणून त्याला विचारले. तू हे माझ्याकडे का घेऊन आलास ? मी अशी काही वस्तू मागविलेच नाही.

याचप्रकारे, आपणही वेदनेला आपल्याकडे बोलावतो व आपले तणावग्रस्त जीवनशैली आणि खराब सवयी तुम्हा स्वतःलाच गोंधळात टाकतात व नंतर तुम्ही हे विसरून जाता, पण जेव्हा आजार वाढू लागतो तेव्हा तुम्ही तक्रार करू लागता.

कधी कधी तर आपण आपल्या आजाराचा आनंदही घेतो, अर्थात हे आपण स्वीकारत नाही. ज्या प्रकारे तुमचे लक्ष आपल्याकडे खेचले जावे याकरिता तुमच्या शरीराचा एखादा अवयव आजारी पडतो, त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःही दुसऱ्याचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आजारी पडता. यात काहीही

आश्चर्यकारक नाही. आजच्या धावपळीच्या जीवनात, कोणालाही दुसऱ्याकडे बघायला वेळ नाही. जोपर्यंत तो आजारी पडत नाही ? ध्यान किंवा मनोयोग ही मूलभूत गरज आहे.

मनोविज्ञानाने हे सिद्ध झाले आहे की मनुष्य नव्वद दिवसांपर्यंत अन्नाशिवाय राहू शकतो, पण इतरांच्या ध्यान देण्याशिवाय तो चौदा दिवसांतच आपली शुद्ध गमावून बसतो कारण ध्यान ऊर्जा आहे, ही जीवनशक्ती आहे.

अर्थात ही बाबही आपल्याला ठाऊक नसेल की एखाद्याचे लक्ष प्राप्त करण्याची इच्छा इतकी जास्त असते की ते प्राप्त करून घेण्याकरिता आपण निम्न ऊर्जा बनवीतो व हसत हसत सर्दी (कोल्ड) इथपासून कॅन्सरपर्यंतही सहन करतो.

एखाद्या नातेसंबंधात, तुम्ही नेहमीच अवलोकन केले असेल की दोन्ही पक्ष एकमेकाचे लक्ष आकर्षित करण्याचा प्रयत्न अर्थात लक्ष प्राप्त करण्याचे भिक्षापात्र पसरवून मागणी करीत असतात.काय तुम्ही कधी विचार करता? दोन भिकाऱ्यांमध्ये सकारात्मक व एकमेकांच्या आवश्यकता पूर्ण करण्याचे नाते होऊ शकते का? वास्तवात आजारातून मुक्ती मिळवण्यासाठी लक्ष प्राप्त करण्याची भीक मागणे सोडून द्या. आपल्या संपूर्ण जागरूकतेशिवाय होणारा एक प्रकारचा सूक्ष्म व मनोविज्ञानासंबंधी भीक मागण्याचा हा प्रकार आहे जो शेवटी शारीरिक

Photograph of Paramahamsa Nithyananda

स्वरूपात भीक मागण्याहूनही अधिक धोकादायक आहे.

जीवन आपल्याला खूप काही शिकवितो. ते समजून घेणे आपली जबाबदारी आहे. पण आपण नेहमी झोपेत चालल्यागत तृप्त राहून जगत असतो. आपल्याला हेसुद्धा ठाऊक नसते की आपण आपल्याकडे कोणाला बोलावत आहोत. याचे उदाहरण मी एका लहानश्या गोष्टीतून देतो :

मोठ्या व्यावसायिक संस्थेमध्ये कार्यरत असलेला एक अभियंता दुपारी जेवणाकरिता नेहमी एकाच प्रकारे जेवण आणीत असे. ते विशेष प्रकारचे जेवण त्याला किती आवडत नाही याची तो नेहमीच तक्रार करीत असे आणि मग त्याचे सहकारी मित्र त्याला आपल्या समवेत जेवणात सहभागी करीत असत. त्या व्यक्तीची दुर्दशा पाहून सर्व मित्रांनी त्याला सल्ला दिला, तू तुझ्या पत्नीला तुझ्या आवडीचे काही बनवाायला का नाही सांगत? किमान बदल म्हणून तरी? एकाच प्रकारचे हे जेवण तुला आवडत नाही याची तिला जाणीव नाही का?

कोण बायको? तो व्यक्ती आश्चर्याने उद्गारला, मी तर अविवाहित आहे. मी माझे जेवण स्वतः बनवितो.

तुम्हाला हे वाचून कदाचित मजा वाटेल, पण हे खरे आहे : आपण आपले जीवनही काही अशाच प्रकारे जगत असतो. कमी जागरूकतेच्या कारणास्तव सुरुवातीला तर आपण वेदनेला स्वत:कडे बोलावतो, आणि मग त्याच्याबद्दलच तक्रार करू लागतो आणि वेदनाशामक औषधाचा आसरा घेतो. लाजेची गोष्ट हीच आहे की आपल्याला या आजारांनी पीडित असल्याचेही कधी वाईट वाटत नाही. कारण सर्व संकटांचे मूळ कारण म्हणून आपण आपल्याला ओळखू शकत नाही. वेदनेची जबाबदारी आपण दुसऱ्यावरच टाकतो, आपल्या स्वत:वर कधी घेत नाही.