वेदनेपासून आनंदापर्यंत (Vednepasun Anandaparyant)
This text was machine-transcribed from the printed book and may contain errors. Select the words and choose “Report a mistake”.
परमहंस नित्यानंद
वेदनेपासून आनंदापर्यंत
(From Pain to Bliss in Marathi)

संपूर्ण विश्वाच्या आनंद समाजवासी आणि नित्यानंद आश्रमाच्या स्वामीगणांना दिलेले प्रवचन
वेदनेपासून आनंदापर्यंत
नित्यानंद वैदीक सायन्सेस युनिर्व्हसिटी प्रेसद्वारे प्रकाशित नित्यानंद वैदीक सायन्सेस युनिर्व्हसिटी यू.एस.ए.चा एक विभाग
नित्यानंद वैदिक सायन्सेस युनिव्हर्सिटी प्रेस येथून प्रकाशित नित्यानंद वैदिक सायन्सेस युनिव्हर्सिटी विभाग, यू.एस.ए. सर्वाधिकार ... २००७ पहिली आवृत्ती :
सर्वाधिकार सुरक्षित. या प्रकाशनाचा कोणताही भाग पुनर्प्रस्तुत करता येऊ शकत नाही तसेच इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिकल, फोटोकॉपी, रेकॉर्डिंग इत्यादी अन्य कोणत्याही प्रकारच्या माध्यमाने प्रसिद्ध करता येणार नाही. याकरिता प्रकाशकाची परवानगी घेणे जरुरी आहे. सदर पुस्तकातील काही माहिती स्वतःसाठी घेतल्यास सदर बाबीकरिता लेखक वा प्रकाशक जबाबदार नसतील. या पुस्तकाच्या विक्रीतून प्राप्त होणारी रक्कम दानधर्मासाठी वापरण्यात येईल. भारतातील मुद्रक :

जगातील सर्वात भीतिदायक गोष्ट आहे वेदना
सर्व जीवित प्राणी एका गोष्टीला घाबरतात, व ती आहे वेदना. जर तुम्ही खोलवर पाहिले तर ध्यानात येईल की माणसे मरणाच्या वेळेस होणाऱ्या वेदना व यातनांना घाबरतात तितके ती मृत्यूला घाबरत नाहीत.
अनेक माणसे भयभीत आहेत गरीबीने, काही नात्यांनी, काही आजारांनी
- पण सर्व भयांचे मूळ आहे वेदना. मनुष्याच्या सर्वच्या सर्व भयांचे कारण आहे वेदनेचे भय. यामुळेच पीडारहित असलेला मोठ्यात मोठा आजार मनुष्य सहन करू शकतो, परंतु साधारण डोकेदुखी सहन करणे त्याला कठीण होऊन जाते.