KAILASA Library/परमहंस नित्यानंद ज्यांचे नाव आहे!/लक्कडबंगोSign in
परमहंस नित्यानंद ज्यांचे नाव आहे!

लक्कडबंगो

This text was machine-transcribed from the printed book and may contain errors. Select the words and choose “Report a mistake”.

प्राण्यांकडून

हल्ला

एवढे मग्न झाले होते की, त्यांना लक्कडबंगो या प्राण्यांचा कळप त्यांच्याजवळ आला हे माहीतच पडले नाही. ज्यावेळी त्यांनी समोर पाहिले त्यावेळी ते प्राणी त्यांच्या खूपच जवळ आले होते. हे सर्व पाहिल्यानंतर नित्यानंद महाराज यांच्या अंतर्मनामधून फार मोठा आवाज निघाला. हा घाबरून सोडणारा आवाज त्यांनी कधीही अनुभवला नव्हता. या आवाजाबरोबरच त्यांनी स्वतःला अरुणाचल पर्वताच्या कुशीत पाहिले आणि त्यांना असा विश्वास वाटला की, अरुणाचल त्यांचे संरक्षण करेल. काही क्षणांतच एका वयोवृद्ध संन्याश्याने हातामध्ये काठी घेऊन लक्कडबंगो प्राण्यांच्या कळपाला हुसकावून लावले आणि जसे हे प्राणी पळून गेले. त्या क्षणी हा संन्यासी अंतर्ध्यान पावला. परमहंस नित्यानंदांना हे काहीही समजले नाहीत की, हा संन्यासी कोठून आला आणि परत कुठे गेला.

त्यांच्या अंतर्मनातून जो आवाज आला त्या आवाजाबरोबरच त्यांचे सर्व शरीर हलके झाले आणि त्याचबरोबरच त्यांनी वेगाने चालण्यास सुरुवात केली. त्यांना असे वाटत होते की, ते हवेतच तरंगत चालत आहेत.

एके दिवशी मध्यरात्रीनंतर ते लवकरच झोपेतून उठले आणि ते प्रवासाला निघाले, त्यावेळी त्या ठिकाणी फिरत असताना पूर्ण काळोख होता. त्यांना कुठल्याही प्रकारचा प्रकाश दिसत नव्हता. चहू बाजूंनी त्यांना जंगलच जंगल दिसत होते. जसे ते भजन गात नदीच्या जवळ आले त्यावेळेस त्यांच्याजवळ लक्कडबंगो नावाच्या प्राण्यांचा कळप येत होता. नित्यानंद महाराज मान खाली घालून भजन गात पुढे जात होते आणि ते भक्तिगीतांमध्ये

Paramahamsa Nithyananda