वास्तविकतेची जाणीव
This text was machine-transcribed from the printed book and may contain errors. Select the words and choose “Report a mistake”.
`जोपर्यंत तुमचे हात उघडलेले आहेत तुम्हाला अशी जाणीव होईल की, नदी तुमच्या हातावरून वाहत आहे. जेव्हा तुम्ही तिला पकडायचा प्रयत्न कराल तेव्हा ती निसटेल.'
- परमहंस नित्यानंद
१२ वर्षांचे असताना एक दिवस अरुणाचलमध्ये एका दगडावर ध्यानावस्थेमध्ये लीन झाले होते. खरे तर ते अन्नामलाई स्वामीजींद्वारा सांगण्यात आलेल्या विद्याविचारांबाबत त्यावर ते प्रयोग करत होते.
ते बसले असताना त्यांना अनुभव आला की ते लुप्त होत आहेत. त्यांनी आपल्या शब्दांत त्या अनुभवाचे वर्णन केले आहे की, अचानक! आपल्यामध्ये शून्यतेची जाणीव झाली. बंद डोळ्यांनीसुद्धा मला माझ्या बाजूला ३६० डिग्रीने दिसायला लागले होते. मी या जीवनशक्तीला फक्त आपल्या शरीरातच नाही, तर बाहेरच्या सगळ्या वस्तूंमध्ये जाणीव केली.' त्यांनी असे जाणीव केली की, ते पर्वतात, झाडात, फुलात आणि आपल्या बाजूंच्या सगळ्या सजीव, तसेच निर्जिव वस्तूंमध्ये त्यांचे वास्तव्य आहे.

अरुणाचलमध्ये ध्यानावस्थेत परमहंस नित्यानंद
आज
परमहंस नित्यानंदांना ज्या शिळेवर आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झाले त्या पवित्र शिळेला ज्ञानप्राप्तीच्या वाढदिवसाच्या दिवशी स्नान घालताना परमहंस नित्यानंदांच्या आश्रमाचे ब्रह्मचारी.

हा माझा पहिला अनुभव होता. या अनुभवाने माझ्यामध्ये प्रत्येक वस्तूबद्दल भरपूर दया आणि प्रेम निर्माण झाले. या अनुभवामुळे मला जीवनाबद्दल भरपूर श्रद्धा उत्पन्न झाली आहे.
आपल्या अंतर्मनात ज्ञान प्राप्त करण्यासाठी ज्या साधनेची आवश्यकता असते ती मला माझ्या अंतर्मनामध्ये दिसून आली आणि त्या साधनेने मला ज्ञान प्राप्त करण्याचा मार्ग दाखवला. या फक्त एका अनुभवामुळे धार्मिक उन्माद, जातीयता, भाषेची कठोरता नष्ट होतात.
परमहंस नित्यानंदांना प्रथम ज्ञानप्राप्ती वैशाख महिन्यामध्ये बुद्ध पौर्णिमेला सायंकाळी झाली.
परमहंस नित्यानंद महाराज अरुणाचल पर्वतावर रोज फिरायला जात असत. ते रोज सकाळी ४ वाजता उठून पर्वताच्या चारही बाजूंना तीन-चार तास भजन, तसेच वर्तमान गोष्टींचा विचार करीत फिरत असत. भजन गात असताना त्यांना आपल्यासमोर कुठले संकट उभे राहणार आहे या गोष्टींची कुठलीही चिंता वाटत नसे. ज्याप्रमाणे लहान मूल आपल्या मातेच्या कुशीमध्ये खेळते, तसेच परम प्रिय नित्यानंद महाराज अरुणाचल पर्वताच्या कुशीत लहान मुलासारखे भजन गात फिरत असत.