KAILASA Library/परमहंस नित्यानंद ज्यांचे नाव आहे!/शाळेत जाणे हा एक संयोगSign in
परमहंस नित्यानंद ज्यांचे नाव आहे!

शाळेत जाणे हा एक संयोग

This text was machine-transcribed from the printed book and may contain errors. Select the words and choose “Report a mistake”.

'एकाग्र होऊन केलेले कोणतेही कार्य हे अंतर्ध्यानाची अवस्था असते. त्यावेळेस आपले जीवन अंतर्ज्ञानाची अवस्था बनून जाते.'

  • परमहंस नित्यानंद
दैनिक डायरी आणि मंत्र डायरी

दैनिक डायरी आणि मंत्र डायरी

शाळेत जाणे हा परमहंस नित्यानंदांच्या जीवनाचा हा एक संयोगच होता. शाळेमध्ये रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र या विषयांमध्ये त्यांनी शोध कार्याबद्दल माहिती लिहिली. याच्याव्यतिरिक्त मंत्राचे उच्चारण, तसेच धार्मिक गोष्टी हे ते मोठ्या उत्साहाने करत असत.

बाजूला दाखविलेले पुस्तक हे त्यांचे प्रमाण आहे. या पुस्तकांमध्ये त्यांनी विधिपूर्वक पूजा-अर्चा (देवी-देवतांच्या पूजेचे वर्णन) करण्याची विधी लिखित केलेली दिसते. आज त्यांचे शिष्य या पुस्तकांचा आधार घेऊन समाजामध्ये विधिपूर्वक पूजा करतात. धार्मिक कार्यामध्ये त्यांना अतिशय गोडी होती आणि हे सर्व कार्य त्यांनी बाल्यावस्थामध्येच केले हे एक मोठे आश्चर्य आहे.

आध्यात्मिक, तसेच धार्मिक गोष्टींबद्दलचे त्यांचे प्रेम पाहून त्यांचे मित्र त्यांना नेहमीच सतवत असत. त्यांचे मित्र त्यांना विचारत असत की, तासन्तास ध्यानावस्थेमध्ये राहून काय लाभ होतो?' तेव्हा परमहंस नित्यानंद महाराजांनी त्यांना उत्तर दिले की, 'वेळ आल्यावर तुम्हाला समजेल.'

आज

ज्यावेळी मी लहान होतो त्या वेळी मी अशी जागा शोधण्यात मग्न होतो की, एकाच छताखाली जीवनाच्या रहस्याचा अभ्यास करू, परंतु नऊ वर्षे झाली अशी कुठलीच जागा मला मिळाली नाही. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मी शिष्यांना किंवा तरुणांना अशीच जागा देऊ इच्छित होतो. द गुरुकुल अॅण्ड

लाईफ ब्लिस टेक्नॉलॉजी प्रोग्राम अशा जागेचे उदाहरण आहे. येथे युवक किंवा तरुण अनेक मार्गाने संशोधन करण्याचे काम करतात. कुठलेही कार्य न करताच ते कार्य पूर्ण कसे करायचे, अंतर्मनामध्ये परमानंद पूर्ण जीवन कसे उत्पन्न करणे या सर्व गोष्टींचा अभ्यास या ठिकाणी करीत असे.

  • परमहंस नित्यानंद

अलीकडेच तमिळनाडूच्या दौऱ्यावर गेले असता, त्यांनी तिरुवन्नमलाई येथे उपदेश देणे व ध्यान शिबिरांचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या शेवटी परमहंस नित्यानंदांनी भरगच्च शिबिरामध्ये रांगेत उभ्या असलेल्या काही मुलांकडे आपले बोट दाखवून आपल्या शिष्यांना सांगून त्या मुलांना आशीर्वाद घेण्यासाठी बोलविले. त्यांना अगोदर प्रश्न विचारले होते, ती हीच मुले होती. स्वामीजींच्या पायावर मस्तक ठेवून आशीर्वाद घेत असताना ती मुले थरथर कापत होती, तसेच त्यांच्या चेहेऱ्यावर एक वेगळीच भावना पहावयास मिळत होती. तेव्हा परमहंस नित्यानंद स्वामींनी या बालकांकडे पाहून मधुर हास्य करून दया भावनेने त्यांच्या खांद्यांना धरून त्यांना उठविले त्यावेळी शिष्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.

एक महत्त्वाची डिग्री

परमहंस नित्यानंद स्वामींनी तामिळनाडूच्या गुडियाथाम येथील पॉलिटेक्निक महाविद्यालय येथून मॅकेनिकल इंजिनीयरींगमध्ये डिप्लोमा घेतली. महाविद्यालयात अभ्यासात लक्ष देत असता त्यांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या आशेचे रंग भरू लागले. काही वर्षानंतर या महाविद्यालयात शिकवणारे शिक्षकही त्यांच्या जीवनाचे प्रथमच आरोग्यदाता (हीलर) बनले.

टेम्पल / समाधी स्थळ
स्मशान स्थळ

पवित्र शहर तिरुवन्नमलाई येथील स्मशान स्थळ हे नित्यानंद महाराजांसाठी ध्यान करण्यासाठी शांत जागा होती. ते पहाटेच घरी येऊन आपल्याजवळील चावीने घराचे टाळे उघडून आत येत असत. घरी वेळेवर न आल्यामुळे त्यांचे आई-वडील त्यांना काहीही बोलत नसत.

गुरुकुल

गुरुकुल

लाईफ ब्लिस टेक्नॉलॉजी

लाईफ ब्लिस टेक्नॉलॉजी
Paramahamsa Nithyananda