वेद व तंत्र
This text was machine-transcribed from the printed book and may contain errors. Select the words and choose “Report a mistake”.
'बौद्धिक श्रद्धाशक्ती ही मानसिक व शारीरिक शक्तीपेक्षा जास्त श्रेष्ठ आहे.'
–परमहंस नित्यानंद
माताची कुप्पाम्मल - एक प्रेरणेचा स्त्रोत
अरुणाचलमध्ये ब्रह्मयोगिनी विभुधानंदादेवी माताजी कुप्पाम्मल नित्यानंदांच्या सुरुवातीच्या काळात त्यांची देखभाल करीत असत व त्याचबरोबर त्यांना आध्यात्मिक मार्गसुद्धा दाखवित असत. बारा वर्षांच्या बाल्यावस्थेमध्ये जेव्हा त्यांना आध्यात्मिक अनुभव येऊ लागले तेव्हा माता कुप्पाम्मलांनी त्यांच्या वाढत असलेल्या चेतनेबद्दल सविस्तरपणे समजावून शारीरिक व मानसिक रूपाने त्यांचा सांभाळ केला. त्याचबरोबर दूरदृष्टीचा विचार करून त्यांनी त्यांना वेगवेगळ्या आध्यात्मिक अभ्यासाचे प्रशिक्षण दिले.

कुप्पाम्मल व परमहंस नित्यानंद

इसाक्की स्वामीगल
आध्यात्मिकता वाढविणारे इसाक्की स्वामीगल
इसाक्की स्वामीजी आध्यात्मिक्तेला वाव देत असत. एक ज्ञानी महापुरुष इसाक्की स्वामीजी म्हणजे तरुण परमहंस नित्यानंदांच्या प्रेरणेचे मुख्य बळ होते. अनेक ज्ञानी महापुरुषांचे सानिध्य प्राप्त करणारे भाग्यशाली परमहंस नित्यानंदाजींचे सुरुवातीचे जीवन या महापुरुषांचे जीवन कशा प्रकारे परमानंदामध्ये कसे लीन होते हे पाहण्यात व्यतित केले. या महापुरुषांना परिपूर्णतेने भरलेले पाहून व त्यांच्या साधेपणाने मोहित होऊन नित्यानंदामध्येही ही परिपूर्णता प्राप्त करण्याची तीव्र इच्छा जागृत झाली.


आत्म-पुराण (एक उपनिषद्), इसाक्की स्वामीगलांनी दिलेली भेट म्हणून दिलेले पुस्तक परमहंस नित्यानंदांच्या आध्यात्मिक शिक्षणाची सुरुवात दर्शविते.
आज
तरुण ब्रह्मचारी, तसेच
गुरुकुलची मुले दिनचर्येच्या
रूपात परमहंस
नित्यानंदजीच्या आश्रमात
वेदांचा जप करतात.
उपदेशाच्या स्वरात स्वर
मिळवून मुले आनंदमय
चेतनेच्या पाळण्यात वाढत
आहेत.

ओलई चुवाडी
ओलई चुवाडी(ताडाच्या
जातीच्या झाडाच्या पानावर
तयार केलेली पांडुलिपी)मध्ये
प्राचीन वैदिक भजन
समाविष्ट आहेत, जे परमहंस
नित्यानंदाजींना इसाक्की
स्वामीजींकडून भेट स्वरूप
प्राप्त झाले.
योगी रामसूरतकुमार एक रहस्यमय बंधन
योगी रामसूरत कुमार किंवा विश्री स्वामीजी एक ज्ञानी पुरुष होते. तिरुवन्नमलाईमध्ये भगवान श्री रमण महर्षीच्या बरोबरीच होते. तिरुवन्नमलाईमध्ये ते एक सुप्रसिद्ध ज्ञानी पुरुष होते, ज्यांच्यावर सगळे जण प्रेम करीत असत. परमहंस नित्यानंद नियमितपणे त्यांना भेटण्यासाठी येत असत.

योगी रामसूरतकुमार थेरमुट्टीजवळील मंदिराचा रथ उभे करण्याच्या जागेपासून इमारतीच्या जिन्यापर्यंत कचरा एकत्रित करीत असत आणि एका भिक्षुकासारखे त्याजवळ बसत असत. लोकांचा एक नियमच बनला की, येता-जाता तेथे थांबून आपल्या भविष्याबद्दल त्यांना ते प्रश्न विचारत असत. शाळेची मुलेसुद्धा तेथे थांबून आपण परीक्षेत पास होणार का, म्हणून विचारीत असत. त्यांना कधी कधीच योगी म्हणून प्रतिक्रिया मिळत असे. एक दिवस परमहंस नित्यानंद शाळेत जाताना तेथे थांबले आणि त्यांना विचारले की, 'आज ते आपल्या परीक्षेत पास होतील का?' त्यांना उत्तर मिळाले, 'पुत्रा, तू तुझ्या जीवनाची परीक्षा पास करशील.'

परमहंस नित्यानंद त्यावेळेस त्या शब्दांचा अर्थ समजू शकले नाही. एक बाई जी त्यांच्याजवळ बसली होती, हे ऐकून ती म्हणाली की, 'जा मुला! आता हे शब्द तुला कळणार नाहीत, परंतु वेळ आल्यावर या शब्दांचे महत्त्व नक्कीच कळेल.'

तिरुवन्नमलाईमधील उत्सवामध्ये योगी रामसूरत कुमार
अन्नामलाई स्वामीजी आणि क्लेषकारक जखम
'सत्यावर प्रयोग करण्याचे धैर्य हीच अनुभवाची चावी आहे.'
- परमहंस नित्यानंद

अन्नामलाई स्वामीगल
अन्नामलाई स्वामीजी हे भगवान श्री रमण महर्षी यांचे शिष्य होते. परमहंस नित्यानंदांनी वयाच्या दहाव्या वर्षी तिरुवन्नमलाई येथील रमण महर्षीच्या आश्रमामध्ये जाण्यास सुरुवात केली. व्याख्यान सत्र चालू होण्याच्या प्रारंभाम ते अन्नामलाई स्वामीगल यांच्या शिष्यांबरोबर नियमितपणे जात असत. अन्नामलाई स्वामीगल यांचे व्याख्यान संपल्यानंतर आनंदित होऊन मिठाई वाटत असत.
अन्नामलाई स्वामीजींनी आपल्या शिष्यांना मोह-माया यांच्या संबंधित व्याख्यान दिले. त्यामध्ये त्यांनी असे सांगितले की, आपले जे हे शरीर आहे ते शरीर नाही तसेच ते वास्तविकताही नाही. जे वास्तविक आहे तो फक्त आपला आत्मा आहे. आपल्या आत्म्यावर कुठल्याही प्रकारची पीडा किंवा करणी, चेटूक, भानामती यांचा काहीही परिणाम होत नाही, म्हणूनच आपला आत्मा दुःख, कष्ट व कुठल्याही रोगापासून फारच दूर राहतो.
महाराजांचे हे शब्द आपल्या कानावर पडताच, परमहंस नित्यानंद त्याच दिवशी आपल्या घरी परतले. त्यांनी स्वयंपाकघरात जाऊन चाकू घेतला. त्यांना हे पाहायचे होते की, खरोखरच आपल्या शरीराला वेदना होतात की नाहीत. यासाठी त्यांनी आपल्या पायाच्या डाव्या मांडीवर चाकूने जखम केली, परंतु याचा परिणाम वेगळाच झाला. कारण त्यांच्या मांडीला जखम तर झालीच त्याचबरोबर शरीराला पुष्कळ वेदनाही झाल्या. त्याचबरोबर आईचा रागही सहन करावा लागला, हे वेगळेच. डॉक्टरांकडून त्यांच्या मांडीला टाकेही घालावे लागले.
त्यानंतर परमहंस नित्यानंदांनी महाराज अन्नामलाई स्वामीजींजवळ जाऊन त्याविषयाबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अन्नामलाई स्वामीगल महाराजांनी त्यांना असे सांगितले की, तुमच्या शरीराच्या वेदना कमी होतील यासाठी मी तुम्हाला अभ्यास करण्याची एक पद्धत सांगतो. सत्यावर प्रयोग करण्याचे तुमचे धैर्य हे तुम्हाला ज्ञानप्राप्तीकडे घेऊन जाईल. या घटनेनंतर परमहंस नित्यानंद महाराज यांची ज्ञान संशोधनाबद्दलची दृष्टी खूपच खोलवर गेली.
आज
आज परमहंस नित्यानंद करोडो
लोकांसाठी प्रेरणेचे स्थान बनले
आहेत. या महापुरुषाच्या फक्त
दर्शनाच्या हेतूने लोक मोठ्या
संख्येने गर्दी करतात.

अंगकोर वट, कम्बोडिया