KAILASA Library/परमहंस नित्यानंद ज्यांचे नाव आहे!/मूर्ती आणि पूजाSign in
परमहंस नित्यानंद ज्यांचे नाव आहे!

मूर्ती आणि पूजा

This text was machine-transcribed from the printed book and may contain errors. Select the words and choose “Report a mistake”.

'पूजा कधी मूर्तीची होत नाही,

ती तर मूर्तींच्या माध्यमातून होते.'

- परमहंस नित्यानंद

परमहंस नित्यानंद घरी एका
छोट्या चौरंगावर जिवंत
वाटणाऱ्या देवी-देवतांचे मोठ्या
भावनेने तल्लीन होऊन पूजा
करत असत. कधी कुठेही
पूजेसाठी जाताना ते नेहमी या
पाच देवी-देवतांच्या समूहाला
बरोबर घेऊन जात असत.

पाच देवी-देवतांच्या मूर्ती आणि पूजेचे साहित्य

परमहंस नित्यानंद पूजेचे साहित्य, तसेच देवी-देवतांच्या मातीच्या मूर्ती तयार करून त्यांना सजवून, नटवून त्यांची पूर्ण श्रद्धेने पूजा करीत असत. मंदिरांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिरुवन्नामलाईतील जवळपासच्या गावांत परमहंस नित्यानंदांनी, तसेच त्यांच्या मित्रांद्वारे उत्सवासाठी तयार केलेल्या अनेक कलाकुसरी बघायला मिळतात.

दागिने व कलाकुसर

आज

शिल्पकार मूर्ती घडवताना

9परमहंस नित्यानंद सेक्रेड आर्ट्स प्रिझरवेशन" नित्यानंदांजींचे एक विशेष लक्ष्य आहे जे मनुष्य प्राण्यांसाठी इंडियन टेम्पल हेरिटेजला समर्पित करत आहेत. पाषाण, काष्ठ, तसेच संगमरवरीचे देव-देवता, द्रविड शैलीतली निमार्णिक मंदिर, धातूच्या शिलांवरती केलेले कार्य, देवतांची लाकडाची बनवलेली वाहने, मंदिराचे दागिने, तसेच वेशभूषा, पूजेला अर्पण करण्याची इत्यादी प्रत्यक्ष परमहंस नित्यानंदांच्या निर्देशनाखाली तयार केले जाते. या दिव्य लक्षाला सहयोग देण्यासाठी कुशल भारतीय शिल्पकार अनंत कृतज्ञतेच्या बरोबर आपले जीवन समर्पित करतात.

गणपतीला जेवण

परमहंस नित्यानंदजी गणपतीच्या मूर्तीला रोज जेवणाचा नैवेद्य दाखवत असत. दाखविलेला नैवेद्य खाण्यासाठी ते गणपतीला विनंती करत व कधी कधी ओरडत असत. एक दिवस त्यांनी एका मुलाची पौराणिक गोष्ट वाचली. तो मुलगा मूर्तीला जेवण देतो तेव्हा ती मूर्ती खरोखरच जेवण जेवत असे. दाखवलेला नैवेद्य गणपतीला खायला लावायचेच हा दृढ निश्चय त्यांनी केला. नित्यानंदांनी असे ठरवले की, आता ते कधीच ओरडणार नाहीत. त्याऐवजी गणपती आपण वाढलेले जेवण जेवत नाही तोपर्यंत त्यांनी अन्नग्रहण करण्याचे बंद केले.

तीन दिवस संपल्यानंतर दाखवलेला नैवेद्य गायब झाला. यावर ते खूप खुश होऊन गणपतीकडे त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

वयाच्या १२व्या वर्षी परमहंस नित्यानंदांनी दिव्यदृष्टीद्वारे पार्वतीची सोन्याची मूर्ती अरुणाचलेश्वराच्या मंदिरात पाहिली. त्यांच्या मनावर त्या मूर्तीचे चित्र खोलवर उमटले. त्यांनी तांब्याचा पत्रा घेऊन, त्यावर मनात उमटलेले चित्र नखांनी काढले. तेच पवित्र असे श्री चक्र होय.

गणेश

गणेश

आज

विश्वभरात परमहंस
नित्यानंदांद्वारे सृजित मंदिरांत
विशाल पूजा-अर्चा या श्रेष्ठ
समजूतीने केली जाते. पूजा
एक आश्चर्यजनक
आध्यात्मिक पद्धती आहे, जी
निसर्गाशी जोडली आहे.

श्री चक्र

श्री चक्र

ब्रह्माण्डात हे श्री चक्र शक्तिशाली व गूढ असे मानले जाते. कौशल्यवान कलाकारांनाही गोंधळात टाकणारे हे कठीण चित्र तुम्ही कसे काय बरे काढलेत, हा प्रश्न परमहंस नित्यानंदांना विचारले असता, नित्यानंदाजींनी सांगितले, हे फक्त नऊ त्रिकोण आहेत, जे विविध कोनांत एकमेकांसमोर बसविलेले आहेत. एकदा तुम्हाला त्याचे तत्त्व समजले की, समजायला सोपे जाईल.

पूजा

9

Paramahamsa Nithyananda