KAILASA Library/लाईफ ब्लीस मेडिटेशन/अनियमितपणे, लयहीन, जोरदार श्वासोच्छ्वासSign in
लाईफ ब्लीस मेडिटेशन

अनियमितपणे, लयहीन, जोरदार श्वासोच्छ्वास

This text was machine-transcribed from the printed book and may contain errors. Select the words and choose “Report a mistake”.

(अवधी : ७ मिनिटे)

वज्रासनातील ध्यान मुद्रा

वज्रासनात बसावे व डोळे बंद करावे. दोन्ही हात कमरेवर ठेवावेत आणि जोरजोराने लयरहित श्वास घेणे व सोडणे. आपले सगळे लक्ष श्वास घेण्यावर व सोडण्यावर असावे. ही क्रिया इतकी जोरदार आसावी की, सारे शरीरच या क्रियेत भाग घेत आहे, असे वाटावे. ही क्रिया सात मिनिटे करावी.

साधारणतः आपल्या शरीरात ऊर्जाचा संचार सहस्रार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत होतो. (डोक्यापासून ते मेरुदंडाच्या खालपर्यंत होतो.) या संचाराची दिशा खालपासून ते वरपर्यंत करण्यासाठी वज्रासनाची मोठी मदत होते.

कुठल्याही आध्यात्मिक क्रियेची सुरुवात करण्यासाठी श्वास-उच्छ्वास हा सगळ्यात चांगला मार्ग आहे. ध्यान विधीचे अनेक प्रकार आहेत. काही साक्षी भावावर आधारित आहेत. तर काही शब्द आणि मंत्रांच्या जपावर आधारित आहेत, परंतु मी सांगतो की, कुठलीही ध्यान क्रियेची सुरुवात करताना श्वास-विश्वासावर लक्ष देणे हा उत्तम मार्ग आहे.

आपल्या शरीरात दोन प्रकारच्या प्रक्रिया आहेत. एक आहे स्वनियंत्रित आणि दुसरी आहे अनियंत्रित. हात आणि पायाचे संचालन एक नियंत्रित प्रक्रिया आहे, परंतु हृदयाची धडधड आणि मेंदूचे कार्य यांच्यावर आपण नियंत्रण करू शकत नाही, म्हणजेच ही अनियंत्रित प्रक्रिया आहे, परंतु श्वास-उच्छ्वास ही एक अशी प्रक्रिया आहे ती नियंत्रित व अनियंत्रित दोन्ही होऊ शकते. जेव्हा तुम्ही श्वासाकडे लक्ष दिले नाहीत तर तुमच्या श्वासाची प्रक्रिया बंद होत नाही. जेव्हा तुम्ही आपले लक्ष एखाद्या गोष्टीकडे केंद्रित करता तेव्हा तुम्ही तुमचा श्वास थांबवत नाहीत. जर असे झाले तर अनर्थ होईल, पण लक्ष ठेवले तर तुम्ही श्वासाच्या प्रक्रियेवर नियंत्रण करू शकता. प्राणायामचे शास्त्र, श्वास प्रक्रियेवर संयम ठेवण्यावरच आधारित आहे. तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही खोल श्वास घेऊ शकता. जितका हळू श्वास घ्यावयाचा असेल तितकाच हळू श्वास घेऊ शकता. खूप वेळेपर्यंत तुम्ही श्वास स्थिर करू शकता किंवा काही मिनिटांकरिता श्वास रोखू शकता. ही श्वास-उच्छ्वासाची प्रक्रिया आपल्या शरीरात नियंत्रित-अनियंत्रित, अशा दोन प्रकारच्या प्रक्रियामधील एक साखळी आहे.

परंतु तुम्ही जागेपणी कधी श्वास रोखल्यावर मरण पावत नाही. कारण त्यावेळी आपली इच्छा आणि जगण्याची प्रवृत्ती यांच्यामध्ये एक संघर्ष असतो आणि आपली

स्वाभाविक जगण्याची प्रवृत्ती आपली क्षणिक इच्छेपेक्षा जास्त मजबूत असते. खरे तर शरीराची सगळी अनियंत्रित प्रक्रिया या स्वाभाविक जगण्याच्या प्रवृत्तीने होते. तुम्ही या स्वाभाविक जगण्याच्या इच्छेमुळे जन्म घेता व जगता.

तुम्ही बहुतेक लक्ष दिले नाहीत की, आपल्या श्वासाची गती आपल्या मन:स्थितीवर अवलंबून असते. आपल्या मनात चाललेले विचार आपली श्वास प्रक्रिया प्रभावित करतात. जेव्हा तुम्ही चिंतीत होतात तेव्हा आपली श्वास प्रक्रिया वेगळी असते. जेव्हा तुम्ही प्रेममय होता तेव्हा श्वास प्रक्रियेमध्ये खूपच अंतर असते. याचा अर्थ तुमच्या श्वासाचा तुमच्या भावनांशी सरळ संबंध आहे आणि ही मन:स्थिती, भावनांबरोबर परिवर्तित होत राहते. जेव्हा तुम्ही तणावलेल्या स्थितीमध्ये असता तेव्हा नेहमी खोल श्वास घेण्याचा सल्ला दिला जातो.

तैतरीय उपनिषद्मध्ये पंचकोशाबद्दल लिहिलेले आहे. अन्नमय कोश (भौतिक शरीर), प्राणमय कोश (श्वास-उच्छ्वास), मनोमय कोश, (मन शरीर), विज्ञानमय कोश (प्रज्ञा शरीर) आणि आनंदमय कोश (आनंद शरीर) हे कोश कांद्याच्या सालीप्रमाणे आहेत, ज्या ? ? ? केंद्रांना, आत्म्याला आपल्या आवरणात झाकून ठेवतात. साऱ्या इच्छा प्राणमय कोशमध्ये एकत्र राहतात. आपल्या इच्छेनुसार आपला प्राण श्वासउच्छ्वासाच्या गतीत परिवर्तित होत राहतो. आपला श्वास आणि इच्छा एकमेकांमध्ये खूपच गुंतलेले आहेत. आपण पाहिले असेलच की, जेव्हा मनात खूप विचार भिरभिरत असतात तेव्हा श्वास गतीमान व जड होतो आणि जेव्हा खूपच कमी विचार असतात त्यावेळी श्वास प्रक्रिया सहज होते.

मन आणि श्वास एकमेकांशी संबंधित असल्याने एकाच्या बदलाने दुसराही स्वतः बदलून जातो. भावना कशा प्रकारे श्वासाच्या लयीला प्रभावित करतात, हे आपण बघितले आहेच, तसेच जेव्हा आपण श्वास प्रक्रियेला नियंत्रित करतो किंवा परिवर्तित करतो तेव्हा तो श्वास प्रत्यक्षपणे मनोभाव आणि मनाच्या स्थितीला प्रभावित करतो.

आपल्या सगळ्या आठवणी आपल्या मांसपेशीत एकत्र साठलेल्या असतात आणि मी पूर्णपणे मानतो की कधी जर आपल्या शरीराचा कुठला भाग कापून वेगळा होतो तेव्हा हळूहळू शरीराच्या त्या भागासंबंधीतील आठवणीपण मरून जातात.

एक छोटासा प्रयोग करून बघा. प्रयत्न करा, जीवनातील कुठलीही जुनी घटना आठवा. आपण आपल्या स्वरुपाची आठवण न ठेवता, शरीराचे रूप बघणे असंभव होते, कुठल्याही घटनेला आठवण्यासाठी आपण आपल्या स्वरूपाची आठवण ठेवणे आवश्यक असते. कारण साऱ्या आठवणी आपल्या लक्षात संग्रहित आहेत.

आपण भावना व त्यांच्या उद्रेकांना आपल्या मनात दाबून ठेवले आहेत. यामुळे आपण सहज नैसर्गिकपणे श्वास घेण्यास असमर्थ आहोत. आपल्या श्वासाची क्रिया कृत्रिम आहे आणि जेव्हा तुम्ही हळूवार प्रकारे श्वास घेता तेव्हा तुम्ही कधीही आपल्या मांसपेशींमध्ये दबलेली संग्रहित भावावेशांना मुक्त करू शकणार नाही. हलकी आणि हळूवार श्वासप्रक्रिया शरीरातील समस्त भागांपर्यंत पोहोचू शकत नाही.

तुम्ही नेहमी एक निश्चित लय किंवा प्रमाणबद्ध श्वास घेऊ शकता. आमच्या अंतरंगात भरलेले संस्कार, दबलेली भावना, आमच्यामध्ये एक विशेष पध्दतीची श्वसन प्रक्रिया सुरवात करते, जिच्यामुळे आम्ही तशा पध्दतीने भावना आणि संस्कारांचा आकर्षित करतो. आमच्या मनात, शरीर रचनेमध्ये उपस्थित कुठलीही वस्तू स्वाभाविकपणे जगण्याची प्रवृत्ती ठेवतो. त्यामुळे आमच्यामध्ये दबून राहिलेले असंस्कार त्यांना अनुकूल परिस्थिती उत्पन्न करून अस्तित्वात राहण्यासाठी आणि पुढे जाण्याची धडपड करतात. जर आपण शरीर यंत्रणेत क्रोधाला दाबून ठेवले असेल, तर हे असंस्कार एकसारखे वर येत राहतात आणि आपल्या अस्तित्वाला जिवंत ठेवण्यासाठी श्वसन क्रियेला अनुकूल ठेवतात. हे एक दृष्ट चक्र आहे. तुमची श्वासाची प्रक्रिया दुसरे काही नसून तुमच्या जुन्या संस्कारांचा मिळता-जुळता प्रभाव आहे.

म्हणून नित्यध्यान अव्यवस्थित श्वासापासून सुरू होते. आपल्याला जेवढे शक्य आहे तितक्या खोल अव्यवस्थित श्वास घ्यायचा आहे, जसे काही श्वास-उच्छ्वास हेच तुमचे सगळे अस्तित्व आहे. नीट समजावून घ्या, श्वास खोल घ्यायचा आहे, लयहीन गतीमान श्वास प्रक्रिया कधीही होता कामा नये. आता ही खोल गतीमान श्वासाची क्रिया तुमच्या मांसपेशींमधून, शरीराच्या अंगप्रत्यंगांतून तणाव दूर करते. त्यामुळे शरीरात दबलेल्या भावोद्रेकांचा नाश होतो. साधारणतः आपल्या मांसपेशी नेहमीच तणावपूर्ण राहतात. अव्यवस्थित श्वास प्रक्रिया आपल्या मांसपेशींना तणावमुक्त करून संस्कारांच्या सफाईला सुरुवात करतात.

आपल्या आतमधील प्रत्येक भावोद्रेक एक वेगळ्या प्रकारची श्वास प्रक्रिया उत्पन्न करतो. तुम्ही बघितले असेलच लहान मुले नेहमी खोल आणि सहज श्वास घेतात.

परंतु ती जसे मोठी होतात, समाज त्यांना आपल्याप्रमाणे बनवायला सुरुवात करतो. सुख-दुःख, अपराध, विश्वास, तणाव इत्यादी भावोद्रेकांचा अनुभव त्यांच्या श्वास क्रियेला पूर्णपणे बदलून टाकतो.

दबलेले संस्कार आणि भावना बाहेर दूर निघून जाण्यासाठी तुम्हाला आपल्या आतामध्ये एक प्रकारचे चक्री वादळ निर्माण करावे लागेल. यासाठी मी कुठल्याच पध्दतीचे लयबध्द प्राणायाम तुम्हाला सांगत नाही. या ध्यान विधीमध्ये अव्यवस्थित खोल श्वास-उच्छ्वास आपल्या जुन्या संस्कारांना नष्ट करतात. हे त्यासारखेच आहे की, तुम्ही कुठल्याही झाडाला जोराने हलवता तेव्हा त्याची सुकलेली निर्जीव पाने गळून पडतात. त्यासारखाच हा प्रकार आहे. ही लयहीन खोल श्वास प्रक्रिया आपल्या दबलेल्या तंत्राला हलवण्याचे काम करते. आपले सगळे जुने दबलेले भावोद्रेक आणि संस्कार नष्ट होतात.

खोल श्वास प्रक्रिया ही आणखी एक गोष्ट आहे जी आपल्या आतमध्ये जास्त ऑक्सिजन पोहोचवते आणि कार्बनडाय ऑक्साइड़ शरीरातून बाहेर काढते. त्यामुळे आपल्याला हलके व प्रफुल्लित वाटते. रक्तात ऑक्सिजनची मात्रा वाढल्याने शरीराचे सर्व भाग जागृत होतात आणि त्यामुळे शरीरातील पेशींमध्ये अधिक प्रमाणात जीवित ऊर्जा तयार होण्यास सुरुवात होते.

साधारणपणे आपण आपल्याला व आपल्या शरीराला एका ओझ्याप्रमाणे समजतो. कारण आपले शरीर स्वतः जिवंत असल्याचे आपल्याला अनुभव होत नाही. ते नेहमी तणावग्रस्त असते. शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढवले तर तुम्हाला तुमचे शरीर हलके झाल्यासारखे वाटते. जेव्हा तुम्हाला ऊर्जा अनुभवता येत नाही तेव्हा आपल्यामध्ये दबलेल्या संस्कारांमुळे तुम्हाला आपले शरीरात जडपणा असल्याची जाणीव होते.

काही बौध्द आश्रमात तर याचा दीक्षेची एक पद्धत म्हणून प्रयोग केला जातो. बौध्द आश्रमात गेलेले साधू जेव्हा आपली साधना पूर्ण करतात तेव्हा त्यांना गवतावर चालण्यास सांगितले जाते. त्यांच्या चालण्याने गवतावर रस्ता तयार होतो, म्हणजे पायाखाली गवत कुस्करते तेव्हा साधूंना दीक्षा देत नाही आणि साधूंना आणखी साधना करण्यास सांगितले जाते. जिचे संस्कार गळून पडले आहेत अशी व्यक्ती कितीही चालली तरी गवत कधीच कुस्करत नाही, कारण ती नेहमी आपल्याला हलके असल्याची जाणीव करीत असते.

जोरजोरात खोल श्वास प्रक्रियेने ऑक्सिजन वाढते व कार्बनडाय ऑक्साइड कमी होतो. त्यामुळे अंतरात्म्याची दबलेली प्रक्रिया जिवंत होते. श्वास प्रक्रिया खोल, तीव्र असली पाहिजे, जणू काही आपण स्वतः श्वास प्रक्रिया बनलो आहोत. याप्रमाणे प्राणऊर्जा उत्पन्न होईल व आपल्या मांसपेशींना हलवून त्यात दबलेल्या संस्कारांना बाहेर काढायला सुरुवात करतात आणि स्वतःला हलके, ऊर्जावान आणि आनंदमय होत असल्याचे अनुभवता. याप्रमाणे आपण पुढच्या पायरीकडे जाण्यास सुरुवात करतो.

जर आपण जोरजोरात श्वास प्रक्रियेसंबंधात व त्यापद्धतीबद्दल जाणण्यासाठी उत्सुक असाल तर आपण दुःखी होऊ नका. आनंद स्फुरण कार्यक्रमात जी ध्यान पद्धती शिकवली जाते, त्याचा आपण अभ्यास करू शकता.