KAILASA Library/लाईफ ब्लीस मेडिटेशन/नित्य ध्यानSign in
लाईफ ब्लीस मेडिटेशन

नित्य ध्यान

This text was machine-transcribed from the printed book and may contain errors. Select the words and choose “Report a mistake”.

(Nithyadhaan in Marathi)

नेहमी आनंदाचा अनुभव घ्या.

परमहंस नित्यानंद

Paramahamsa Nithyananda

आपल्या मनात नित्यानंद अवस्था प्राप्त करण्यासाठीध्यान विधी.

नित्य ध्यान

(अनंत, शाश्वत, नित्य आनंद यासाठी ध्यान विधी)

नित्यध्यान काय आहे हे समजावून सांगण्यापूर्वी मी ध्यान प्रकटीकरणाच्या पार्श्वभूमीबद्दल थोडक्या सांगू इच्छितो, आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर मी महिनोन्महिने मौन स्थितीत होतो. त्या वेळी मी चांगल्या ध्यान विधीच्या शोधात होतो. तेव्हा मला माझ्यात तीच प्रतिकृती निर्माण झाल्याचे जाणविले. तीच प्रतिकृती दुसऱ्यांच्यात ही उत्पन्न करू शकतो. या यशस्वी शोधानंतर जी सुरुवात केली ती म्हणजे आनंदस्फुरण कार्यक्रम (लाईफ ब्लिस प्रोग्राम), ज्यात मी शरीरातील सात ऊर्जा केंद्रांवर कार्यरत केले. केंद्रांना शुध्द व ऊर्जायुक्त करण्यासाठी ध्यान धारणाच्या पध्दती तयार केल्या. त्यानंतर नित्य आनंद स्फुरण कार्यक्रम तयार केला. त्यामध्ये आपल्या शरीराभोवती असलेल्या ७ शक्तिमय थरांवर ध्यान धारणेच्या पध्दती तयार केल्या. जेणेकरून आपल्याला शांततामय व आनंदमय मूक्त प्राप्त होईल. त्यानंतर मी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम तयार केले.

मी बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारच्या ध्यानाच्या विधी देत राहिलो. उदा. ध्यान स्फुरण कार्यक्रम, आत्मस्फुरण कार्यक्रम इ. त्यामुळे साधकांना सर्व प्रकारे परिपूर्णता प्राप्त होईल. मी ध्यान धारणेच्या जवळजवळ १०० प्रकारच्या पध्दती माझ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून देत आहे. त्यामध्ये प्रत्येक ध्यान विधीचा एकच प्रयत्न आहे की, शरीरांतर्गत ? ? ? कुठलेही चक्र कार्यरत करत असताना अंतरात्मा उत्साहित व्हावा.

लोक नेहमी मला विचारतात की, प्रत्येक मानव अभ्यास करू शकेल अशी ध्यान धारणेची साधी सोपी पध्दत आहे काय ? जेव्हा हा प्रश्न नेहमीच विचारला जाऊ लागला तेव्हा मी त्यासंबंधी विचार करण्यास सुरुवात केली.

मी खोलवर विचार करून ध्यान धारणेची एक पध्दत शोधली. त्यामध्ये माझे सर्व तत्त्वज्ञान, शिकवण व अनुभव संमिलीत आहे. मी पूर्ण धार्मिक अशी ध्यान धारणा तयार केली.

एकाच विशिष्ट गोष्टीवर ध्यान न देता या पध्दतीमध्ये पूर्णतः अनुभव येण्यासाठी मी प्रयत्न केला आहे. शेवटपर्यंत नित्य आनंदी राहण्यासाठी असलेली हा ध्यान धारणा विधी मी आता तुम्हाला शिकवणार आहे. नित्यध्यान विधी अचानक माझ्या डोक्यांत प्रकट झाला. एका क्षणात त्या विधीच्या सर्व पायऱ्या (स्टेप्स) मला साफ दिसायला लागले. या विधीचा प्रत्येक भाग दुसऱ्या भागाशी कसा संबंधित आहे आणि मानवाच्या उत्साहात कसे सहभागी आहेत, हे मला स्पष्ट अंतःपटलावर साफ दिसू लागले. नित्यध्यान हे ध्यानाच्या क्षेत्रांमध्ये मी पराकाष्ठेचे संशोधन केले.

इथे आणखी एक गोष्ट समजणे आवश्यक आहे. ऋषींना मंत्रदृष्टा (जी व्यक्ती मंत्राना पाहू शकते) सुध्दा म्हटले जाते, याचा अर्थ होतो की, समाधी अवस्थेमध्ये ते मंत्र किंवा तंत्राला आपल्या अंतर्दृष्टीने पाहू शकतात. हे दृश्य त्यांना या अवस्थेत नजरेसमोर दिसते. हे अस्तित्व आपल्या स्वतःमध्ये परिपूर्ण असते. यामध्ये नवीन काही जोडलेतोडले जात नाही. याप्रकारे कोणताही मंत्र किंवा तंत्र कोणाचीही व्यक्तिगत निर्मिती नाही. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, मी या ध्यानाच्या निर्मितीचा अधिकारी नाही. ती तर स्वयंभू प्रक्रियाआहे. उचित वेळी प्रकट झाली.

आपण आता या ध्यान विधीबाबत अगदी सखोल विश्लेषण करू या. या सूत्राचे पाच भाग आहेत. मी प्रत्येक भाग खुलासेवार सांगतो.