घनतामय गुंजन ध्वनि उत्पन्न करणे (हमिंग)
This text was machine-transcribed from the printed book and may contain errors. Select the words and choose “Report a mistake”.
(अवधी : ७ मिनिटे)

या दुसऱ्या अवस्थेमध्ये वज्रासनातच बसावे. आपले दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवून चिनमुद्रेमध्ये बसावे. ज्यामध्ये दोन्ही हातांचे अंगठे व तर्जनी जुळवावी आणि बाकीची तीन बोटे सरळ असावी. या अवस्थेत बसून जोराने व जितके आपल्या जमेल तितके अम् (Humming) स्वर एकसारखे ध्वनित करावे. जेवढे आपल्याने जमेल तेवढे जोरात व जास्तीत जास्त वेळ करावे. (दीर्घ हमिंग करावे)
तुम्ही पूर्ण पणे तल्लीनतेने अम् (Humming) करावे. तुम्ही पूर्ण पणे तल्लीन होऊन हमिंग (Humming) कराल, तेव्हा तुमच्या अंतर्मनात चालू असलेली विचारशृंखला कमी होत जाते. आपण कुठल्या व्यक्तीशी नाही तर स्वतःच स्वतःच्या मनाशी बोलत असतो व एक एक कल्पना तयार करीत असतो. ते थांबवण्यासाठी हमिंग (Humming) ही एक उत्तम साधना आहे. आपल्या मनात विचारांची चल-बिचल चालू असते, ती कमी होण्यासाठी याची मदत होते.
काही लोक नेहमी असे समजतात की, विचारांशिवाय बसणे खूप कठीण आहे. जेव्हा तुम्ही प्रौढावस्थेत ही साधना करण्याचे साहस करता तेव्हा सगळ्यात प्रथम तुमचे
मनच तुम्हाला विरोध करील. कारण आपल्यामध्ये विरोधाची भावना आपण पहाल. आपले मन विरोध करते. ते विचारहीन अवस्थेत गप्प बसूच शकत नाही. त्याला वर्षानुवर्षे सवय झालेली असते. अचानक तुम्हाला गप्प बसणे अवघड होते. ते स्पष्ट रूपात विरोध करते. जेव्हा मनुष्य आपण विचार करायचा नाही असे ठरवितो तेव्हा नेहमी त्याच्या उलटच होते. त्यावेळी अचानक खूप समस्या उद्भवतात. आपल्या मनाला विचारांशिवाय वर्षानुवर्षे राहायची सवय नसते. त्याला शांत करण्याचा सुरुवातीचा कोणताही प्रयत्न जणू काही प्रवाहाविरुद्ध पोहण्यासारखे आहे. प्रवाहाविरुद्ध पोहण्याचा प्रयत्न केला तर निश्चित रूपाने नदी आपला विरोध प्रकट करते. त्यामुळे अशा वेळी मन दुप्पट वेगाने विचारांच्या गाडीने धावू लागते.
हीच वेळ आहे की, बरेचसे लोक ध्यान साधना सोडून देतात. आपण हरलो असे त्यांना वाटते आणि ते विचार करतात की, साधना आमच्यासाठी शक्य नाही. परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की, हा अनुभव सर्व साधकांना साधनेच्या सुरुवातीला होतो. आपल्याला प्रयत्न करायचा आहे. यासारख्या जगण्याला तपस्या असे म्हणतात. जर तुम्ही पहिल्यापासूनच हरल्याचे मनात आणत राहिलात तर तुम्ही कधीच सफल होणार नाही.
पौराणिक कथांमध्ये असा उल्लेख आहे की, एकदा देव व दानवांनी दोघांनी मिळून समुद्राचे मंथन करून अमृत काढण्याचा प्रयत्न केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे समुद्रमंथन केल्यावर सर्वात पहिले विष निघाले. समुद्रमंथनावेळी खूप काही मिळाले. सगळ्यात शेवटी अमृत निघाले. साधनाच्या प्रक्रियेवेळी अशीच खूप मंथन होण्यास सुरुवात होते. त्यावेळी आपल्याला आत्मज्ञानाचा अनुभव होतो. सगळ्यात प्रथम नेहमी नकारात्मकता बाहेर निघते. उदास होऊ नका. या प्रक्रियेच्या वेळी सारी नकारात्मकता आपल्या आतून बाहेर निघत आहे हा संकेत मिळतो. जोपर्यंत तुम्ही स्वतः अनुभव प्राप्त करून घेत नाही, तोपर्यंत तुम्ही ध्यानाचा अभ्यास करीत रहा.
सुरुवातीच्या स्थितीमध्ये आपल्यामनाची बडबड, आपला अंतर्संवाद आपल्याला एकसारखा त्रास देतो. तीव्र गतीने अम् ध्वनी अत्यंत उपयोगी अस्त्र होऊ शकते. मनाला शांत करण्यासाठी ते साहाय्य करते. मणिपूरक चक्र व स्वाधिष्ठान चक्र यांच्यामधील भागांमध्ये आपला अंतर्संवाद उत्पन्न होतो. या क्षेत्राला हार (Hara) सुद्धा म्हणतात. जेव्हा आपण तीव्र गतीने अम् (Humming) ध्वनीत करतो तेव्हा नाभीच्या उजव्या बाजूला आपण एक कंपन अनुभवतो. हे सतत चालू असलेल्या अंतर्संवादाच्या प्रक्रियेला बाधा आणतात व या क्षेत्राला मंधीत करतो. हा आवाज बेंबीच्या क्षेत्रातून उत्पन्न झाला पाहिजे.
अंतर्संवाद ही एकमात्र मनाचा उगम आहे. अंतर्संवाद हा एक मनाचा आधार आहे. अम् ध्वनीपासून अंतर्संवाद कमी होऊ लागतो. तेव्हाच तुम्ही स्वतः विचाररहित अवस्थेकडे वाटचाल करू लागता. तुम्हाला तुमच्या आतमध्ये एक दुसराच अनुभव येऊ लागतो.
एक चांगला जाणकार ड्रायव्हर गाडीच्या सगळ्या तक्रारींची नोंद ठेवतो. जसे गाडीच्या गतीचा आवाज उत्पन्न होतो इत्यादी. इंजिनमधून वेगळ्या प्रकारे आवाज येऊ लागला तर जाणकार ड्रायव्हर लगेच समजून जातो व तो लगेच इंजिन ठीक करतो. प्रवाशांना याबद्दल पत्तासुद्धा लागत नाही. परंतु जाणकार ड्रायव्हर निश्चित समजून जाईल. असेच जर तुम्ही ध्यानाचा नियमित अभ्यास करू लागलात तर अम् (Humming) ध्वनीची तीव्रता व गुणवत्तेनुसार आपण आपल्या शरीरात काम करण्याच्या प्रक्रियेला चांगले समजू लागतो. जर तुम्ही जास्त जेवलात आणि ते खाद्य पदार्थ आपल्या शरीराला अनुकूल नसतील, तर तुमच्या अम् ध्वनीमध्ये बदल झालेला तुम्हाला अनुभव येईल. तेव्हा तुम्ही स्वतः आपल्या शारीरिक गरजा बदला. म्हणजे अम् (Humming) ध्वनी प्रवाहमय होईल. अम् ध्वनी आपल्या शरीरामध्ये एक सूक्ष्म कंपन तयार करतात आणि जर आवश्यकता असेल किंवा कसली कमतरता असले तर ती ठीक करण्यासाठी मदत करते. हे आपोआप होते. त्याला जबरदस्ती करण्याची आवश्यकता नाही.
आपले शरीर व मन नेहमी एकत्र राहत नाही. मी लोकांना नेहमी सांगतो की, जर तुमचे शरीर इथे आहे तर तुमचे मन नक्कीत इथे नसेल. आपले मन नेहमी भटकत असते. आपल्या शरीराकडे स्वाभाविक बुध्दी असते, जी आपले काम नेहमी वेळेवर करत असते. परंतु मन नेहमी या बुध्दीला अस्वीकार करते आणि शरीराला असे अनुचित काम करण्यास भाग पाडते, जे कालांतराने आजाराच्या रूपात बाहेर पडते. जर शरीराला नेहमी जबरदस्तीने चालवले तर एक न एक दिवस निश्चितपणे वाईट परिणाम दिसून येतील.
कधी कधी वेळेस आपण जास्त जेवण जेवतो. आपले शरीर आपल्याला सांगत असते की, आता पुरे झाले, पण मन संतुष्ट होत नाही. त्याला आणखी काही तरी पाहिजे असते, ते एकसारखे भरत राहते आणि आपल्या शरीराला आणखी इजा पोहोचवते. याचा परिणाम आपल्याला नंतर कळतो. शरीर आणि मन यांच्यामध्ये समजूतदारपणा असणे आवश्यक आहे, नाही तर आपले मन शारीरिक कृतीमध्ये फसत राहील आणि याच्यातून बाहेर पडणे अशक्य होईल. शरीर आणि मन यांच्यात सेतू बांधण्यासाठी किंवा सुसंवाद स्थापित करण्यासाठी अम् ध्वनी सगळ्यात चांगली पद्धती आहे. अम् ध्वनीने आपण शरीराला ऊर्जेच्या रूपात अनुभव करू लागतो. ज्या वेळेपासून अम् ध्वनी उच्चारण कराल त्या वेळेपासून आपण आपल्याला हलके वाटण्याचा अनुभव येतो. जसे काही आपण तरंगत आहोत. आपण आपल्या शरीरात जडपणाची जाणीव राहत नाही.

कारण अम् ध्वनी आपल्या मनाच्या आणि शरीराच्या कंपनाला एकत्रित करतो. शरीर आणि मन लयबध्द रूपात व्यवस्थित होऊन आपल्याला ऊर्जाच्या रूपात अनुभवास येतात. अम् हे ओम् नाही, हे नीट ध्यानांत ठेवा, तुम्ही सामान्य रूपात आपले दोन्ही ओठ एकमेकास जोडून मम् (Mmmmm) ध्वनीचा उच्चार करा. अम् ध्वनी बेंबीच्या क्षेत्रातून चालू करायचा आहे. आपणास जमेल तितक्या जोरात व तेवढ्याच दीर्घपर्यंत हा ध्वनी करावा. त्यावेळेस खोल श्वास घेण्याची आवश्यकता नाही. शांतपणे आरामात करा. आपल्या पूर्ण शक्तीला आणि स्वतःला या कंपनाला उत्पन्न करण्यासाठी साहाय्य करा.
तुम्ही प्रयत्न करा की अम् ध्वनीच्या मधल्या अंतराला कमी करण्याचे तुम्ही थोड्या वेळांनी अनुभव कराल. नंतर तुम्हाला जाणवेल की ते सहजपणे होत आहे. नंतर तुम्ही
फक्त प्रेक्षक म्हणून राहाल. शरीर व मन दोन्हीमध्ये अम् ध्वनीच्या कंपनांची उच्चारणा सुरू झालेली असेल.
तुम्ही वज्रासनात बसून दोन्ही हात गुडघ्यावर चिन मुद्रेत ठेवावेत. चिन मुद्रा इथे दाखवलेली आहे. दोन्ही हातांना गुडघ्यांवर ठेवणे. दोन्ही हाताचे अंगठे व तर्जनी एकत्र जुळवून बाकीची तीन बोटे उघडी सरळ ठेवावीत. ऊर्जेला पूर्ण शरीरात पसरण्यासाठी चिन मुद्रेची मदत होते. ही मुद्रा आत्मिक ऊर्जेला शरीराच्या बाहेर पडण्यास रोखते.
पहिल्या दोन चरणांत एकसारखा श्वास घेण्याची प्रक्रिया आणि तीव्रतेनी अम् ध्वनीच्या उच्चारानंतर, आपण पुढच्या चरणात प्रवेश करूया जेथे आपण आपल्या अंतर क्षेत्रात प्रवेश करतो.
जर तुम्हाल हे अम् ध्यान आवडत असेल आणि याबद्दल आणखी जाणून घ्यायचे असेल तर करू शकता. आनंद स्फुरण कार्यक्रम (ASP) या लाईफ ब्लिस प्रोग्राम (Life Bliss Program) मध्ये महामंत्र पद्धतीचा अभ्यास शिकवला जातो.

सहस्रार
आज्ञा
विशुद्धि
अनाहत
मणिपूरक
स्वाधिष्ठान
मूलाधार