चक्र ध्यान
This text was machine-transcribed from the printed book and may contain errors. Select the words and choose “Report a mistake”.
(ऊर्जा केंद्र)
(ASP) या लाईफ ब्लिस टेकनिक(Life Bliss Program)मध्ये शिकवला जातो.
(अवधी : ७ मिनिटे)

या चरणासाठी बसू शकत असाल तर वज्रासनात बसा, जर तुम्ही वज्रासनात बसू शकत नसाल तर सुखासनात बसा. आता तुमचे ध्यान एक एक करत सगळ्या चक्रांवर ठेवा. मूलाधार चक्रा(Root Center)पासून ते सहस्रार चक्रापर्यंत (Crown Center) आपल्या शरीरात सात ऊर्जा केंद्र आहेत. या चक्रांची जागा जाणून घ्यावी.
आपले सगळे व्यक्तित्व तीन शरीरांनी बनलेले आहे. पहिले स्थूल, दुसरे सूक्ष्म आणि तिसरे कारण शरीर. अशा प्रकारे तीन चेतना आहेत. जागृत अवस्था, स्वप्न अवस्था आणि सुषुप्ती अवस्था. या तीन शरीर व तीन चेतनांच्या अवस्थेच्या पलीकडे आपला आत्मा स्थित आहे. पाहिजे तर याला कुठलेही नाव द्या. संस्कृतमध्ये या परम स्थितीला शरीर त्रैवसाक्षी, पंचकोशापलीकडे या अवस्थेला त्रय साक्षी असे म्हणतात. (तिन्ही शरीराचा साक्षी, पंचकोशाच्या वर आणि तीन चेतनांचे साक्षी).
या सात ऊर्जा केंद्रांचा आपल्या अंतर्मनाच्या वेगवेगळ्या विशेष भावोद्रेकांशी संबंध आहे. ज्याच्यापासून शारीरिक आणि भावनात्मक समस्या उत्पन्न होतात, असे जुने संस्कार कुठल्याही विशेष ऊर्जा केंद्राला विरोध करतात. हा संस्कार आपल्या अंतर्मनात प्रकट होतो. आपण ध्यान करत असल्यामुळे एक प्रकारच्या बेशुध्दी अवस्थेत जातो. ज्यावेळी आपण या ऊर्जा केंद्रांना ध्यानाने उत्तेजित करतो त्यावेळी या केंद्रातून सर्व प्रकारच्या नकारात्मक भावोद्रेकांना नष्ट करतो आणि त्यावेळी आपल्या मनामध्ये प्रेम आणि करुणा यांच्या सारखे सकारात्मक भाव निर्माण होऊ लागतात.
बरेच आजार फक्त मानसिक असतात. जे काही आपण बघतो त्याचा सरळ आपल्या मनावर परिणाम होतो. पण आपण कधीही मन आणि शरीरांच्या संबंधांना समजू शकत नाही. शरीरात त्याच्याजवळचा जो ऊर्जा केंद्र आहे तो प्रभावित होतो. आपल्याला माहीत आहे की, जेव्हा आपण चिंता करतो, तेव्हा आपल्या पोटात त्रास उत्पन्न होतो. म्हणून सर्वात महत्त्वाचे आपल्याला शारीरिक व मानसिक आजारांना बरे करण्यासाठी सर्व ऊर्जा केंद्र शुध्द ठेवावी लागतात. खाली मी सांगितले आहे की, कोणता घटक ऊर्जा केंद्राला बाधित करतो आणि कोणता घटक त्याला मुक्त करते.
सर्व मनोभाव जशा कल्पना, घाबरणे, काळजी करणे, दुसऱ्यांचे लक्ष वेधून घेणे, द्वेष, अहंकार, असंतृष्टपणा हे सगळे नकारात्मक भाव आपल्याकडे आहेत, जेव्हा एका खोलीमध्ये काही वस्तू ठेवल्या असतील आणि कोणी आपल्याला सांगितले की, त्या वस्तू तुम्ही उचलून आणा, तर आपण त्या उचलून आणू शकता, कारण की त्याचे एक सकारात्मक अस्तित्व असते. परंतु जर आम्ही आपल्याला सांगितले की तिथे एक
खोली आहे त्यामध्ये जो अंधार पसरलेला आहे तो आपल्याला सांगितले की, त्याला उचलून आणा. आपण अंधाराला उचलून आणू शकत नाही. आपण अंधाराला उचलून घेऊन जाऊ शकत नाही, कारण ते एक नकारात्मक अस्तित्व आहे. त्याचा उचलू शकत नाही. आपण तेथे जाऊन दिवा किंवा बल्ब लावा. अंधार आपोआप नाहीसा होईल. आपल्या भावावेशांचे अस्तित्व अंधकाराप्रमाणे नकारात्मक आहे. आपण याला आपल्यातून बाहेर काढू शकत नाही. आपल्याला फक्त एवढेच करायचे आहे की, आपला आतमध्ये प्रकाश होऊ द्यायचा आहे आणि मग नकारात्मक भावावेश आपणहूनच नाहासे होतील.
एकदा गौतम बुद्धांनी एक गाठ बांधून आपल्या शिष्यांना ती गाठ सोडविण्यास सांगितले. शिष्यांनी दोरीला खेचून ती गाठ सोडविण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु शेवटी त्यांना ती सोडवता आली नाही व ती गाठ आणखी घट्ट झाली. त्यानंतर बुद्धांनी आपल्या दुसऱ्या एका शिष्याला ती गाठ सोडविण्यास सांगितले. शिष्याने सावधतेने ती गाठ पाहिली आणि हळूहळू ती गाठ सोडविली. बुद्धांनी समजावले की, अज्ञानतेची गाठ सोडविण्यासाठी याच प्रकारे सावधतेने पाहून ती सोडवावी लागते. आपल्याला स्वत:मधील चेतनेमध्ये पाहावे लागेल की, या भावोद्रेकांची ठेवणूक कशी आहे आणि त्या चेतनेमुळे या नकारात्मक भावोद्रेकांचा लगेचच नाश होईल.
तर या भागामध्ये आपण आपली सर्व चेतना मुलाधार चक्रापासून सहस्रार चक्रांपर्यंत आपण घेऊन जाणार आहोत आणि या प्रकारे खालून वर सहस्रार चक्रांपर्यंत घेऊन जाऊ. ज्यावेळी आपल्या चक्रांवर लक्ष ठेवायला सांगितले जाईल तेव्हा ते स्वतः ऊर्जा केंद्र बनेल. आपण आपल्याला पूर्ण ऊर्जा केंद्र म्हणून अनुभव कराल. हा भाग पूर्ण होईपर्यंत आपण स्वतःला उत्साहित आणि हलके झाल्याचे अनुभवाल. यानंतरच आपण पुढील भागात जाऊया.
जर तुम्हाला चक्रांच्या विज्ञानाबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही लाईफ ब्लिस प्रोग्राम किंवा आनंद स्फुरण कार्यशाळा प्रवेश घ्या. ज्यामध्ये सर्व चक्रे आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या भावोद्रेकांबद्दल सविस्तर माहिती सांगितली आहे, तसेच प्रत्येक चक्रासाठी विशेष ध्यानाच्या विधी सांगितल्या आहेत.
| ऊर्जा केंद्र | विरोधाचे कारण | खोलणे |
|---|---|---|
| मूलाधार चक्र | कल्पना करणे किंवा काल्पनिक (गोष्ट) | खऱ्याचा स्विकार |
| स्वाधिष्ठान चक्र | मरणाचे भय | मरणाच्या सच्चाईला स्विकारणे |
| मणिपूरक चक्र | चिंता | चिंता करण्याचे सोडणे |
| अनाहत चक्र | दुसऱ्याचे लक्ष आकर्षित करणे | मनात इच्छा न ठेवता प्रेम करणे |
| विशुध्दी चक्र | तुलना किंवा ईर्ष्या | प्रत्येक व्यक्तीशी तुलना करणे व जलस |
| आज्ञा चक्र | अहंकार | सरळता |
| सहस्त्रार चक्र | असंतुष्ट | कृतज्ञता |