KAILASA Library/लाईफ ब्लीस मेडिटेशन/स्तब्ध बसणे - एकदम शांत बसणेSign in
लाईफ ब्लीस मेडिटेशन

स्तब्ध बसणे - एकदम शांत बसणे

This text was machine-transcribed from the printed book and may contain errors. Select the words and choose “Report a mistake”.

(अवधी : १ मिनिटे)

पुढील सात मिनिटे तुम्ही फक्त स्तब्ध बसा.

A woman sitting in a meditative posture

मन म्हणजे विचारांचा एक संग्रह आहे. एकसारखे एकामागोमाग एक विचार येत राहतात. जसे माशाच्या टँकमध्ये किंवा हौदात बुडबुडे येतात. त्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नसतो. ते सगळे वेगवेगळे असतात. ते फक्त प्रकट होतात व एकत्र येतात. त्याचप्रमाणे आपले विचार प्रकट होतात, पण त्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नसतो. तुम्ही एक साधारण अभ्यास करा व तुमच्या मनात जे काही विचार येतात ते लिहून काढा. तुम्ही १० मिनिटे शांत व जागरूकतेचा भाव ठेवा. जसे विचार येण्यास सुरुवात होतील तसे ते पेपरवर लिहून काढा. असे तुम्ही केवळ १० मिनिटे करा. १० मिनिटे संपल्यावर तुम्ही ते वाचा. त्यानंतर तुम्हाला वाटेल की, ती एक वेड्या माणसाची डायरी आहे.

एक विचार व दुसरा विचार यांचा एकमेकांशी काहीच संबंध नसतो. जेव्हा तुम्ही एक कप कॉफी पिण्याचा विचार करता आणि लगेच तुम्ही ऑफिसमध्ये अर्धवट पडलेल्या कामाबद्दल विचार करता. या दोन्ही घटना अगदी स्वतंत्र आहेत. एकानंतर एकसारखे नेहमी येणारे विचार एकाच घटनेचे असू शकतात. तरीही त्या विचारांमध्ये काही संबंध किंवा निरंतरता नसते. नेहमी दोन विचारांमध्ये अंतर असते. त्या विचारांमध्ये एक शांतता असते. विचार नेहमी असंबद्ध असतात.

जेव्हा आपण या विचारांना आपापसात जोडत जातो तेव्हा समस्या उत्पन्न होतात. आपण या विचारांशी जोडले जातो आणि आपल्याला त्रास होतो. उदाहरणादाखल जर आपण १० वर्षांपूर्वी आईस्क्रिम खाल्लेले असेल आणि सात वर्षांपूर्वी खाल्लेले असेल आणि आपण काल आईस्क्रिम खाल्लेले असेले, हे सगळे आपल्याला आनंदमय वाटत असेल. जेव्हा जेव्हा आपण आईस्क्रिम खाल्ले असेल तेव्हा तेव्हा तुम्ही नेहमी त्याचा वेगळाच आनंद घेतला असेल. जेव्हा तुम्ही सगळ्या भावना आपसामध्ये जोडता तेव्हा त्यांची एक साखळी तयार होते आणि समस्या उत्पन्न होतात.

तुम्ही या अनुभवाला पुन्हा अनुभवण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही परत त्याच प्रकारच्या अनुभवांनी आपल्या विचारांना जोडून एक साखळी (Shaft) बनवता. तुम्ही काही वेळापूर्वी आईस्क्रिम खाताना तेवढा आनंद नसेल घेतला जेवढा काही दिवसांपूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी आईस्क्रिम खाताना घेतला असेल. जर तुम्ही आईस्क्रिम खाताना आनंद घेतला नसेल तरीसुध्दा तुम्ही विश्वास करू लागता आणि खाण्याचा आनंद घेऊ लागता.

त्याचप्रमाणे कष्टाचा अनुभव, जो दहा वर्षांपूर्वी दुःखाचा अनुभव केला होता, ज्या दुःखाचा अनुभव तीन वर्षांपूर्वी केला होता आणि ज्या दुःखाचा अनुभव काल केला होता, या सगळ्या एक वेगळ्या घटना आहेत. आपण या सगळ्या दुःखांच्या अनुभवांना जोडतो व विचार करायला लागतो. माझे जीवन एक दुःख आहे. आपल्या जीवनात आपल्याला खूप आनंद मिळाला असेल तर आपण बोलू शकतो की, माझे जीवन सुखमय आहे, पण ही सत्यता नाही. आपल्या जीवनात दुःखही नाही आणि सुख नाही. सगळ्या घटनांना एकत्र जोडून आपण चूक करतो. विचारांचा एकमेकांशी संबंध आहे, ही धारणाच चुकीची आहे.

आपण त्याच विचारांना जोडतो ज्या आपण लक्षात ठेवतो आणि स्वतःच साखळी (Shaft) तयार करतो. जसे फुलांच्या गुच्छामधून एक फुल काढून आपण हार बनवतो. आपल्याकडे अनंत, अगणित विचार आहेत, पण आपण काही विचारांनाच लक्षात ठेवून त्याची साखळी तयार करतो. साखळी (Shaft) ची रचना करणेच पहिले (मूळ) पाप आहे, जेव्हा आपण साखळी (Shaft) बवतो तेव्हा आपण पीडा तयार करतो.

जर आपल्याकडे आनंदाच्या आठवणींची साखळी असेल तर त्या अनुभवांना आणखी पुढे वाढवण्याचा आपण प्रयत्न करतो. पुन्हा त्याच आनंदाचा अनुभव घेण्याचा आपण प्रयत्न करतो. दुःखाच्या अनुभवाची साखळी तयार केली असेल तर ती आपण तोडून त्यापासून वाचण्याचा प्रयत्न करतो. कारण आपण त्या दुःखाच्या अनुभवांपासून दूर जाण्याचा, विसरण्याचा प्रयत्न करीत असतो. आपण त्याला ना वाढवू शकतो, ना त्याला टाळू शकतो. कारण साखळीचे काही अस्तित्वच नाही. साखळी ही एक कल्पना आहे, खोटे आहे. तिचे काही अस्तित्वच नाही.

आपण जे काही अनुभवले आहे ते आपल्यात स्वतंत्र आहे. ज्यावेळी तुम्ही त्या अनुभवाला एकमेकांशी जोडता तेव्हा आपण स्वतः आपल्यासाठी नरक तयार करतो. तेव्हा आपल्याला समजते की, दुःखाची अनुभूती ही एक कल्पना आहे. त्याची खोलीही कल्पनेच्या आधारावर आहे. ज्याचे अस्तित्व स्वनिर्मित आहे. साखळी अचानक उत्पन्न होते. साखळी काल्पनिक आहे. त्याचे काही अस्तित्वच नाही. दुःखापासून तयार झालेली साखळी ही अवास्तविक असते. तिचे काहीच अस्तित्व नाही. जेव्हा तुम्हाला ते उमजते तेव्हा तुम्ही मुक्त होता.

कारण आपले विचार इतके शक्तिशाली असतात. त्यांच्यात एवढी ताकद असते की, दोन विचारांना जोडून एक कल्पना तयार करतात. ही कल्पना तयार करण्याची प्रक्रिया आहे, साखळी ही अहंकाराद्वारे कार्यशील होते. विचाराशिवाय अहंकार काहीच नाही. खरे म्हणजे, विचारांचे हे वैशिष्ट्य साखळी बनवण्यासाठी उपयोगी पडते. जर मी बोलतो की, अहंकाराचे अस्तित्व नाही. कारण साखळीचे काही अस्तित्वच नाही आहे. साखळी ही एक कल्पना आहे. अहंकार केवळ एक नाव आहे जे कडी बनवण्याच्या प्रक्रियेला आपण देतो. एकांत हा निरंतराची अनुभूति तयार होते. या कडीपासून हा अहंकारच मायेला जन्म देतो.

कारण या वेळी तुमचे सगळे विचार एकमेकांना जोडले जातात. आपण विचार करतो की, आपला एक मीपणा आहे, पण सगळे विचार स्वतः स्वतंत्र आहेत, तर मी आणि अहं होण्याचा विचारसुद्धा एक कल्पना आहे. जेथे कुठलेच विचार एकमेकांशी जुळत नाहीत. आता आम्ही मूळतःच असंबद्ध आहोत. आम्ही स्वतः आत्मज्ञानी आहोत. पण तसा अनुभव येण्याची आवश्यकता आहे.

एक दिवस एक शिष्य जेन गुरू यांच्याकडे गेला आणि त्यांना विचारू लागला. मी कसा बुध्द बनू शकतो, तेव्हा गुरूंनी त्याला तोंडावर एक जोरात थोबाडीत मारली आणि बोलले की, तू पहिल्यापासूनच बुध्द आहेस. जर बुध्द स्वतःच येऊन आपणास विचारेल की, बुध्दत्व होण्याचा मार्ग काय आहे तर तुमची प्रतिक्रिया काय होईल? बस तशीच प्रतिक्रिया जेन गुरूंची आहे. तर भावना या सगळ्या असंबद्ध आहेत. फक्त हे उमजण्याची आवश्यकता आहे.

एका व्यक्तीचे सुख-दुःखाचे अनुभव भाग्यावर आधारित आहेत. तेव्हा त्याच्याकडे निवडण्याचे काहीच विकल्प नाहीत. आपल्याला दुःख किंवा सुख निवडण्याचे काहीच हक्क नाहीत. पण आपल्याकडे एक मार्ग आहे की, जो या अनुभवांना संबंध असेल. ज्या संबंधाचा अनुभव एक वर्षापूर्वी केला असेल आणि ज्या संबंधाचा अनुभव एक वर्षापूर्वी केला असेल आणि ज्या संबंधाचा अनुभव तुम्ही आता करत असाल. या सगळ्या एक वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ज्या वेळी आप या गोष्टींना जोडतो तेव्हा आपण एक प्रयत्न करत असतो की, साखळीला आणखी वाढवायची किंवा तोडायची जर या संबंधांनी आपल्याला स्फुरण दिले असेल तर आपण आशा करतो की, या संबंधांना भविष्यामध्ये सुखमय (आनंदी) ठेवावे.

जर आपला संबंध दु:खाशी आहे तर त्या संबंधाला तोडण्याचा प्रयत्न कराल किंवा त्यासंबंधी आपले विचार बनवाल. हे संबंध आपल्यासाठी ठीक नाही. जर तुम्ही या गोष्टीचा स्वीकार करत नसाल, तर आपल्या संबंधाचा प्रत्येक क्षण एक नवीन अनुभव असेल. आपण स्वभावतःच असंबंध आहोत.

खऱ्या समस्येचे कारण दु:ख किंवा सुख नाही. खरी समस्या एकमेकांमध्ये चुकीची समजली जाते आणि शेवटी कल्पनांची साखळी बनवतात. साधू-महात्म्याच्या विषयी जर त्याला सुख मिळते तेव्हा त्याचा भोग घेतात व नंतर ते विसरून जातात. जेव्हा त्याला दु:ख होते तेव्हा त्याचा भोग घेऊन ते विसरून जातात. ते त्या अनुभवांना वेळेच्या अनुसार विसरत नाही. जेव्हा आपण अनुभव वेळेच्या बरोबर विसरायला सुरुवात करतो, त्याच वेळेपासून यातनांना सुरुवात होते.

आपण या बाहेरील जगाला जिंकून पण शांती आणि आनंदात केंद्रित राहू शकतो. बाहेरील जगातल्या कुठल्याही वस्तूचा परित्याग करण्याची काही आवश्यकता नाही. मात्र मी पणाची जी छोटी भावना आहे त्याचा परित्याग केला पाहिजे. एकदा का आपण साखळी बनवायचे बंद करतो तेव्हा आपल्याला अनुभव येतो की, आपली ओळख ज्याला आपण नेहमी पकडून ठेवावाशी वाटते, ते सर्व दु:खाचे एकमेव कारण आहे. ज्या क्षणी आपण आपल्या अम् पणाला त्याग देतो तेव्हा आपण आनंदात प्रवेश करतो. त्या अवस्थेमध्ये आपल्याला बाहेरील कुठल्याच गोष्टी प्रभावित करू शकत नाही. कारण आपण या घटनांना एकत्र जोडण्याचा स्वभाव परित्याग केला आहे. आता सगळ्या घटना आपल्यासाठी नवीन घटना आहेत. हे जीवन आपल्याला सुंदर बघायला लावते. आपल्याला सर्व काही सुखमय आणि आनंदमय वाटायला लागते. आपण पूर्व घटनांना सत्य घटना मानण्यास बंद करतो.

ज्यावेळी जीवनाचा प्रत्येक क्षण जसा आहे तशाच प्रकारे आपण त्याचा स्वीकार करू लागतो. आनंदाचा अनुभव तुम्हाला स्वतःहूनच यायला लागतो. तुमच्यावर बाहेरील परिस्थितीचा परिणाम तेव्हा पडू शकतो जेव्हा तुम्ही त्याला अनुमती देता. जर तुम्ही मौन राहिलात तर तुम्हाला कोणीच त्रास देऊ शकत नाही. लोक नेहमी माझ्याकडे तक्रार करतात की, आम्हाला प्रत्येक क्षणी जगावेसे वाटते, पण आमच्या आजूबाजूचे लोक आमचे शोषण करतात. तुम्ही चांगले लक्षात ठेवा की, तुमच्या मौन सहमतीशिवाय तुम्हाला कोणीच त्रास देऊ शकत नाही किंवा तुमचे शोषणही करू शकत नाही. तुम्ही असंबंध आहात, हे तुम्हाला चांगले कळले, तर तुम्हाला आनंदचा अनुभव प्रत्यक्ष येईल.

निर्वानशटकम्मध्ये शंकारांनी सांगितले आहे की, सदा में समत्वम् ना मुक्ति ना बंधह: चिदानंद रुपम शिवोहम् शिवोहम्। मी ना बंधनात आहे, ना मुक्त आहे. मी नेहमी समतोल स्थितीमध्ये राहतो. शिवची शक्ती शिवत्वमध्ये स्वभावतः आहे. बंधन आणि मुक्ती हे मनाने तयार केलेले आहे. मुक्तीचे अस्तित्व तोपर्यंत आहे जोपर्यंत बंधनाचे अस्तित्व आहे. जर बंधन नसेल तर मुक्ती शब्दाला अर्थच नाही, असे या श्लोकात शंकारांनी सांगितले आहे.

तुम्ही अंतर्यात्रा फिरत असला किंवा बाहेरील यात्रा करत असाल, या शोधात तुम्ही कुठेही जाण्याचा प्रयत्न करत असाल, तर सत्यापासून लांब जात आहात. ही यात्रा किंवा शोधाची प्रक्रिया तुम्हाला सत्यापासून दूर ठेवते.

सत्य इथेच आणि वर्तमानात होवो, कुठे जाण्याची आवश्यकता नाही की, कुठल्याही

यात्रेची आवश्यकता नाही. परत यात्रेची प्रक्रिया होणे हे दर्शवते की, आपण साखळीची निर्मिती केली. आपण काही उन्नती बघतो, पण शोधामध्ये काही उन्नती नाही. कारण कोणी असा नाहीच आहे की, जो उन्नती करत आहे. जो कोणी (व्यक्ती) प्रत्येक क्षणाला मरत आहे, तर उन्नती कोण करणार. जेव्हा तुम्ही परस्पर विचारांमध्ये असंबध होता तेव्हा स्वतःही आपली ऊर्जा सर्व दिशांमध्ये विस्फोट करता. तेव्हा भौतिकावादी किंवा आध्यात्मिक होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. यासाठी शंकर सांगतात की, नाही बंधन आहे. नाही मुक्ती आहे. ते या दोघांच्या वर गेले आहे. या दोन्ही फक्त धारणा आहेत.

आपले व्यक्तित्मत्व व अहम्‌पणा कधी सुधारू शकत नाही. काही लोक व्यक्तिमत्त्वाच्या विकासावर काम करतात. कुठल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करणार. पहिला बघा कोण व्यक्ती आहे का ? ज्याचा विकास केला जाईल. असंबध विचारांची श्रृंखला मात्र आहे. तुम्ही तुमच्या विकासाचा जर प्रयत्न करत असाल तर तुम्ही फक्त साखळीच निर्माण करत असाल, तर तुम्ही फक्त साखळीच निर्माण कराल. आपल्या विकासाबद्दलचा विचार आपल्याला चांगला माहीत असेल. असा विचार येऊ शकतो की, मी विकसित झालो आहे, पण ही चांगले वाटण्याचे एकमेव भावना आहे. खरे सांगायचे झाले तर या स्वतःचा अहम्‌चा विकास केला जाऊ शकत नाही. या नकली मीला फक्त समाप्त केले जाऊ शकते. जोपर्यंत तुम्ही मीला उन्नती करण्याचा प्रयत्न करत राहाल तोपर्यंत आपण काल्पनिक साखळी निर्माण करत राहणार.

जोपर्यंत मन उपस्थित आहे. असत्यबरोबर ओळख राहिल शंकर सांगतात – ब्रह्म, जगत मिथ्या जीवो ब्रह्मदेव ना परा याचा अर्थ असा आहे की, ब्रह्मच सत्य आहे, जगत् मिथ्या आहे आणि आत्मा ब्रह्मापासून वेगळा नाही येथे ते वाहून जाते की, जेव्हा मनाचे अस्तित्व उत्पन्न होते. सत्य स्वयंप्रकाशित होते. जोपर्यंत मन आहे तोपर्यंत विचार राहतात. विचार एक तर भूतकाळात असतात किंवा भविष्यकाळात असतात. वर्तमानकाळात कुठलेच विचार नसतात, वर्तमानात फक्त जागरूकता असते. वर्तमान चैतन्य आहे, म्हणून जोपर्यंत विचार उपस्थित आहे, तोपर्यंत आपण विचारांची शृंखला तयार करीत असतो. आपण या विचारांना जोडून सुख आणि दु:खाची काल्पनिक शृंखला निर्माण करीत राहतो. ज्या क्षणी ही शृंखला निर्माण होते, त्या क्षणी असत्याशी ओळख होते. याचे कारण विचार कधीच एकमेकांशी जोडलेले नसतात, तरीही आपण त्यांना जोडत असतो. विचारांना जोडण्याची प्रक्रियाच जीवनातील सर्व दु:खांचे मूळ कारण आहे. कारण आपण विचारांना जोडून विचार करतो, तेव्हा एक काल्पनिक अस्तित्व जन्म घेत असतो. याला शंकर जीव म्हणतात. जेव्हा हा जीव अस्तित्व धारण करतो, मिथ्या जगतसुद्धा अस्तित्व धारण करतो. जेव्हा आपण स्वतःच विचारांना असंबंधित करीत असतो तेव्हा ही नकली ओळख तिरोहित होते आणि ब्रह्म चेतना प्रकाशित होते.

आपल्याजवळ दोन प्रकारची ओळख आहे. ज्याचा परिचय आपण बाह्य जगतमध्ये देत असतो आणि दुसरा परिचय आपल्या आतमध्ये अंतर्मुख असतो. जो परिचय आपण बाह्य जगताला देतो तो म्हणजे अहंकार होय. जो परिचय आपण आपल्या अंतर्मनाला देतो, त्याला ममकार म्हणतात. दोघांचा आपापसात निरंतर मतभेद असतो. उदाहरण म्हणून बाहेरच्या जगामध्ये आपला परिचय आपण असे आहोत, आपण तसे आहोत, या पध्दतीच्या आधारावर देत असतो, परंतु अंतर्मनामध्ये आपणाला माहिती आहे की, आपण कुठे तरी अडकून आहोत. जिथे या दोन्ही परिचयांमध्ये अंतर आहे. आपला जो परिचय आपण बाहेर देतो तो नेहमी खाण्यापेक्षा जास्त असतो. आपणा स्वतःला दुसऱ्यांसमोर मोठे ठरवण्यासाठी व्यक्ती नेहमी प्रयत्न करीत असते, परंतु जेव्हा आपण आपला परिचय आपल्याला देतो, तेव्हा जितका

खरेपणा आहे त्याहीपेक्षा पुष्कळ कमी आपल्याला रेखांकित होतो. जी आपल्यामध्ये शक्ती आहे त्यामध्ये कधीच संतुष्ट नसतो. त्याचे खरे अवलोकन करीत नाही. आपण लोक निरंतर आपल्या स्वतःला कुठल्याही प्रकारे बेहतर करण्याचा प्रयत्न करतो. आपण तर आध्यात्मिकेमध्ये संतुष्ट आहोत किंवा भौतिकतेमध्ये असंतुष्ट आहोत. जिकडे आपण सदैव काही तरी ढकलत असतो, असा आपला परिचय असतो आणि बाह्य परिचयांत आपण सदैव आवश्यक्यतेपेक्षा ढकलपणा करीत असतो. या कारणांमुळे दोन्ही व्यक्तिगत परिचयांमध्ये सदैव मतभेद राहतात.

हेच कारण आहे की, आपण जेव्हा काही गोष्ट करीत असतो तेव्हा पुष्कळच सावधनतेने करतो. कारण की आपण जो विचार करतो, त्यापेक्षा वेगळ्याच पध्दतीने ती गोष्ट करतो. जेव्हा आपण जो विचार करतो, तो त्याच प्रकारे शब्दांमध्ये बोलतो, तेव्हा जे लोक आपल्या आसपास राहतात ते आपल्यापासून दूर पळून जातात. रामकृष्णांनी याला या प्रकारे सांगितले आहे. विचार आणि शब्द दोघांनीही एकाच वेळी जन्म घेणे म्हणजे आध्यात्मिक खरेपणा आहे. हे जेव्हा संभव होते तेव्हा आपण दोन्ही परिचयांच्या पलीकडे जातो.

ही दोन्ही परिचय खोटी आहेत. हा परिचय जी शृंखला बनविते त्याचाच परिणाम आहे. ते खरेपणाने निघत नाही. जितका वेळ आपण या परचयांना चिकटून राहू, तोपर्यंत आपण संसारात अडकून राहू. एक वेळ आपण या दोन्ही परिचयांच्या पलीकडे जातो, तेव्हा आपण आत्मज्ञानी होतो. पूर्ण वेळ विचारांना आपण बनवत असतो, त्यांना स्थिर करीत असतो आणि त्यांना तोडत असतो. बनविण्याची प्रक्रिया (ब्रह्म), स्थिर ठेवण्याची प्रक्रिया (विष्णू) आणि तोडण्याची प्रक्रिया (महेश) सतत चालू राहते. जेव्हा आपण बनविणे, स्थिर करणे, न तोडणे या तीन प्रक्रियाना थांबवितो, तेव्हा आपण या तिन्हीच्या वर जातो. तेथे आपण परब्रह्मच्या स्थितीपर्यंत पोहोचतो.

या स्थितीमध्ये आपण समजण्याबरोबर ध्यानात ठेवावे की, आपले विचार आपसांत झोलेल नसतात, ते अतार्किक आणि असंबंधित असतात. आपल्या विचारांमध्ये कोणताही सरळ संबंध नसतो. जे विचार उठतात, त्यांना दाबण्याचा प्रयत्न करू नका किंवा त्यावर प्रतिक्रियासुद्धा व्यक्त करू नका. ते सर्वच विचार असंबंधित असतात. आपल्या स्वतःमध्ये अंतर साक्षी भावाची चेतावनी होण्याची सुरुवात होऊ लागेल तेव्हा आपण दोघांच्या वर जाल. तेव्हा तुम्ही अनुभव करू लागाल की, ही सुखाची शृंखला आहे किंवा दु:खाची शृंखला आहे, परंतु आपण जी पृष्ठभूमी आहे, ज्यावर या शृंखला बनविल्या आहेत.

आपण स्वीकार करा किंवा करू नका, आपण आत्मन् आहोत. आपण स्वभावतःच असंबंध आहोत. तर आपण पुढील सात मिनिटे या समजूतीसह मौन बसा आणि संबंधित स्थितीचा अनुभव करा. या स्थितीत येण्याने अंतर्मन आनंदमय होईल. ही एक आत्मज्ञान प्राप्त करण्याची उत्कृष्ट पध्दती आहे. जर आपण खरोखर प्रेरित झाला आहात, तर आपण नित्यध्यान स्फुरण कार्यक्रम करा. ज्यामध्ये आत्मन्च्या असंबंध धारणेबाबत विस्तारांनी सांगितले आहे.

नित्यध्यान स्फुरण कार्यक्रम २ दिवसांचा ध्यान कार्यक्रम आहे. आपल्या स्वतःमध्ये केंद्रित होण्यासाठी आणि खऱ्या ध्यानमयतेशी जोडण्यासाठी हा कार्यक्रम बनविला आहे. हा कार्यक्रम आपल्याला मनाच्या कचाट्यातून मुक्त करतो. आपल्या भावावेशांच्या आवेषापासून मनन करतो, जो मनाचा उत्पाद आहे. या कार्यक्रमाचा उद्देश सुख-दु:खांशी संबंधित जुन्या मानसिक ठेवणीला तोडून, साफ करून मोकळे स्थान तयार करणे आहे, ज्यामध्ये ध्यान पल्लवित आणि पुष्पित होऊ शकेल.