KAILASA Library/लाईफ ब्लीस मेडिटेशन/मंत्र ऐकाSign in
लाईफ ब्लीस मेडिटेशन

मंत्र ऐका

This text was machine-transcribed from the printed book and may contain errors. Select the words and choose “Report a mistake”.

(वेळ - १० मिनिटे)

या अंतिम चरणामध्ये आपण फक्त शांत आणि आनंदमय मनःस्थितीमध्ये ज्याचे उच्चारण होत आहे ते मंत्र ऐका. पूर्ण सृष्टीमध्ये आपला एकाकार होण्याचा अनुभव करा आणि आपल्या आत मंत्रांचे कंपन प्रवाहित होताना पहा. मंत्र एक प्रकार आहे, आपले आभार सृष्टीच्या प्रति अथवा गुरुचा प्रति प्रगट करण्याचा, ज्यांच्या कृपेने हे अप्रतिम ज्ञान प्राप्त झाले, ज्यामुळे अज्ञानातून मुक्त होऊन आपण नित्य आनंदचा अनुभव आणि स्थिती प्राप्त करण्यामध्ये सक्षम आणि सफळ होऊ शकलो.

जर कर्मकांड आणि पूजेमध्ये आनंदित होत असाल तर या मंत्राच्या साथीने गुरुपूजा करू शकता.

जर आपण पूजाविधीमध्ये इच्छुक नसाल किंवा आपल्याला त्या रुची नसेल तर आपण फक्त शांत मनाने बसा आणि मंत्र ऐका. मंत्र ऐकूनच आपले पुष्कळ कल्याण होईल. मंत्र एक प्रकराचे कंपन उत्पन्न करतात आणि हे कंपन आपल्या अंतरात्म्याला शुध्द करून आनंदमय बनविते.

या प्रकारे या ध्यान विधीचा अभ्यास दररोज करा. दिवसातून कमीत कमी एक वेळ आणि आपल्या आतील एक नव्या सुरुवातीचा अनुभव घ्या. ही पध्दती आपल्या शरीराला आणि मनाला, शुध्द चेतना आणि आनंदमय अवस्था प्राप्त करण्यायोग्य बनविते.

आपण सर्व अनुभव करा आणि नित्य आनंदच्या अवस्थेला प्राप्त करा. या आशीर्वादसोबत – नित्यानंद