Books / His name is Nithyananda Marathi merged

9. ज्ञानप्राप्ती होण्याच्या आरभीच्या दिवसांमध्ये ...

# ज्ञानप्राप्ती होण्याच्या आरभीच्या दिवसांमध्ये

असीम सत्तेच्या अदृश्य हातांनी मार्गदर्शन घेतेवेळी परमहंस नित्यानंद हे ऑकारेश्वर(मध्य प्रदेश) ते तामिळनाडू(दक्षिण भारत)दरम्यान अल्प काळासाठी कावेरी नदीकाठी थांबले. भक्तजनांनी आणलेले भोजन ग्रहण केल्यानंतर आणि खुल्या आकाशात किंवा झोपडीमध्ये राहून, एकांतात किंवा जनसमुदायात पुजा, हवन इत्यादी कार्य करीत राहिले. त्यांनी लोकांना ध्यान करायला शिकविले आणि त्यांचे जीवन सुखी करण्यासाठी साहाय्य केले. या तरुण स्वीमीजींच्या रोग बरे करण्याच्या (हीलिंग) चमत्कारिक शक्तीबद्दलची माहिती जंगलात लागलेल्या आगीप्रमाणे सर्वत्र पसरली.