8. ज्ञानाच्या शोधात
# ज्ञानाच्या शोधात
'आश्रम हें ऊर्जा श्रेंत्र आहे तेथील प्रत्येक रूस्ता आध्यात्मिक यात्र्या आहे. ' - परमहस्स नित्यानंद
घर सोडण्याची इच्छा बळावली
एका संध्याकाळी घर सोडण्याची इच्छा इतकी तीव्र झाली की, परमहंस नित्यानंदांना वाटू लागले की, आता ही इच्छा लगेच पूर्ण केली पाहिजे. त्यांना असे वाट् लागले की, ते हे सध्याचे जीवन जगत आहेत त्याचा थोडाही उशीर न करता त्यांनी त्याग केला पाहिजे व ज्याचा त्यांना शोध घ्यायचा त्या नवीन जीवनात प्रवेश केला पाहिजे. जे जीवन त्यावेळी ते जगत होते ते जगण्याची त्यांना इच्छा राहिलेली नव्हती.
परमहंस नित्यानंदांनी हा निर्णय प्रथम आपल्या आईला सांगण्याचे ठरविले. ते तिच्यावर अतिशय प्रेम करीत होते आणि त्यांच्या आईला कमीत कमी दुःख व्हावेत, अशी त्यांची इच्छा होती. त्या रात्री १० वाजता आपल्या आईजवळ गेले व तिला विचारले, 'जर मी मेलो तर तू काय बरे करशील ?' त्यांच्या आईने सांगितले, आहेस ? काय दुविधा आहे. ' परमहंस नित्यानंदांनी म्हटले, घकाही नाही, काही विषेश गोष्ट नाही. मी तर असेच जाऊ इच्छितो.' त्यांच्या आईने विनातक्रार होकार दिला, भी काय करू शकते ? जर असे होणार असेल तर मला ते स्वीकारावेच लागेल.' परमहंस नित्यानंदांनी आपल्या आईकडे घर सोडण्याची इच्छा व्यक्त केली. हे ऐकून त्यांच्या आईच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. दु:खाने त्यांचे शरीर थरथरू लागले. मला माहीत होते की, तू मला एक दिवस सोडून जाणार, ' त्यांच्या आईने म्हटले. त्यांनी आपल्या आईला पुढे विचारले की, भी घर सोडून जावे अशी तुझी इच्छा नाही का ?' त्यावर त्याच्या आईने म्हटले, भाही, मला माहीत आहे की, तुला जायची इच्छा आहे. माझी अशी इच्छा आहे की, तू तेच कर जे तुला जीवनात करायचे आहे. मी तुला तसे करण्यापासून थांबवू शकत नाही, परंतु मी तुला जाताना पाहू शकत नाही याचसाठीच मी रडत आहे. '
परमहंस नित्यानंद आपल्या आईचे शर्तविरहित प्रेम पाहन आश्चर्यचकित झाले. ती खूप दु:खी झाली होती, तरीही तिला असे वाटत होते की, तिच्या मुलाच्या मनात जे आहे तेच त्यांनी करावे. तिने त्यांच्या मार्गात अडथळा निर्माण केला नाही. आईचे निष्कपट आणि निःस्वार्थी प्रेम पाहन त्यांना एकदम भरून आले. खरच ती निःस्वार्थी होती.
भारत व नेपाळच्या पलीकडे
'संगळ्या महान तीर्थस्थळांमध्ये अस्तित्वाचे ऊर्जा स्वर गुंजत आहेत. ज्याच्यात असणे हीच ध्यानावस्थेची स्थिती आहे. ' - परमहंस नित्यानंद
परमहंस नित्यानंद स्वामीजींची ज्ञानप्राप्तीची तीव्र इच्छा त्यांना भारत
आणि नेपाळ यांच्या पलीकडे घेऊन गेली. हिमालयात तपोवनपासून ते दक्षिणमध्ये कन्याकुमारीपर्यंत आणि पश्चिममध्ये द्वारकापासून पूर्वकडे कलकत्तापर्यंत ज्ञानाच्या शोधात र वर्षे फिरत राहिले. आपले अस्तित्व पूर्णपणे एकरूप करण्याचा त्यांचा अनुभव या काळात चरम सीमेपर्यंत पोहोचला. त्या वेळात त्यांनी जवळजवळ ७०,००० मैल पायी यात्रा केली.

महावतार बाबाजी
महावतार बाबाजी
महावतार बाबाजी हिमालयातले एक जिवंत महापुरुष आहेत. परमहंस नित्यानंद स्वामी ज्ञानाच्या शोधान भ्रमण करत असताना बाबाजींनी हिमालयात त्यांना दर्शन दिले. ते बाबाजीच होते की, ज्यांनी त्या भेटीमध्ये नित्यानंदांना भरमहंस नित्यानंद' असे म्हटले होते. आज ते ते त्याच नावाने ओळखले जातात.

आज
परमहंस नित्यानंद स्वामी हिमालयाच्या श्रुखंलेमध्ये आणि इतर उच्च कर्जा केंद्रांमध्ये जाऊन वेळोवेळी आपल्या शिष्यांना मार्गदर्शन करत असतात. आध्यात्मिक भ्रमणाच्या पथाबरोबर ते प्रत्येकाच्या मनात परिपर्ण होण्याच्या इच्छेला सुजित करतात.
हिमालया ट्रिप २००७


ते भ्रमणाच्या वेळेला रुद्राक्ष लंगर नेहमी आपल्याबारो बर घेऊन जात. पाणी प्यायच्या आधी ते रुद्राक्ष लंगर घालुन ऊर्जा पडताळून पाहून मगर ते पाणी प्यायचे.

पवित्र राख ठेवण्याची ही केसरी रंगाची थैली. ज्ञानाच्या शोधात फिरताना ती सदैव त्यांच्या जवळ असायची.
ही रुद्राक्ष माळा नेहमी भ्रमण करताना त्यांच्या गळ्यात असते.

स्पर्श उपचारांचा पहिला चमत्कार
हिमालयमध्ये १७,००० फूट उंचीवर तपोवनामधून परतताना, परमहंस नित्यानंद स्वामीजींनी सेनेच्या ट्रकमध्ये लिफ्ट घेतली. जसा एका खाईवरून ट्रक गेला त्यांना धक्का लागला आणि ते एका धातूच्या तुकड्यावर जाऊन पडले. ज्यामुळे त्यांच्या मणक्याला गंभीररीत्या जखम झाली. सेनेच्या डॉक्टरांनी त्यांना १५ दिवस आराम करण्याचा सल्ला दिला, पण नित्यानंदांनी त्यांचे एकही ऐकले नाही. जखम झालेल्या ठिकाणी हात ठेवून ते चालत राहिले. जेव्हा हरिद्वारला आल्यावर त्यांचा एक्स-रे काढला गेला तेव्हा त्यांच्याव्यतिरिक्त बाकी सगळे आश्चर्यचकित झाले होते. त्यांची जखम पूर्णत: बरी झाली होती. या छोट्या घटनेमुळे परमहंस नित्यानंदांना असे जाणवले की, स्पर्श करून आरोग्य बरे करण्याच्या या पद्धतीमुळे एक दिवस विश्वातील कोट्यवधी लोकांना लाभ होईल.
आज
परमहंस नित्यानंदाद्वारे तयार झालेले हीलर्स पूर्ण विश्वाला परमहंस नित्यानंद स्पिरिच्युअल हिलिंग सेवेतर्फ निःशुक्ल सेवा प्रदान करीत आहेत.

माणिकर्णिका घाट, बनारस - मृत्यूवर विजय
पवित्र गंगा नदीच्या किनारी वसलेले हे स्मशानघाट बनारसचे अत्यंत पवित्र स्थळ समजले जाते.भगवान शिवाने या स्थानावर ब्रम्हाण्डाची सुष्टी निर्माण केली होती, असे मानले जाते.
इथे परमहंस नित्यानंदांनी स्वत: मृत्यूचा अनुभव घेतला आहे. जेव्हा ते गहन ध्यानावस्थेमध्ये होते तेव्हा या खोलवरील अनुभवानंतर त्यांनी जाणले की, धरतीवरील मनुष्य जातीला सर्वात अधिक भयभीत करणारी गोष्ट अर्थात 'मृत्यू ला त्यांनी जिंकले आहे.


ज्ञानाच्या शोधात भटकत असताना २२ वर्षांच्या वयात त्यांना नित्य आनंदाची स्थिती प्राप्त झाली. त्या ज्ञानप्राप्तीनंतरचे त्यांचे हे पहिलेच चित्र होय. जेव्हा त्यांच्या नेत्रांची ज्वाला शमली होती तेव्हा फक्त निश्चिलता राहिली होती. राजशेखरन परमहंस बनले होते.
आण
परमहंस म्हणतात की, आध्यात्मिक विकासासाठी आध्यात्मिक भूमण एक महान कुत्ती व प्रक्रिया आहे. ब्रह्मचर्य प्रशिक्षण कार्यक्रमाच्या वेळी परमहंस नित्यानंदांनी शिष्यांना संन्याशांच्या रूपाने भिक्षा मागण्यासाठी पाठविले. त्यांनी म्हटले, संन्याशी बनून भिक्षा मागण्याची ही कला भावनात्मक चंचलतेपासून मुक्ती देते. जेव्हा तुम्ही भिक्षा मागायला जाता, तेव्हा तुम्हाला जे काही मिळाले त्यात खुश होऊ नका आणि तुम्ही गमावले असेल त्याबद्दल दुःखीही होऊ नका. '

