10. एक स्वप्न पूर्ण झाले
# एक स्वप्न पूर्ण झाले
मी परमानद प्राप्त करण्याची पद्धूत शोधली आहे. माझा उद्देश प्रत्येक मनुष्याने हा अनुभव करायचा आहें की जो वेणळ्या प्रकारचा आहे, अनंत आहे आणि परम आनंदच त्यांचा यथार्थ स्वभाव आहे.'
- परमहंस नित्यानंद
परमहंस नित्यानंदांना आश्रमाच्या जागेबाबत पहिलेच स्वप्न दर्शन झाले होते. बेंगलोरच्या सीमेत पसरलेले व्यापक आश्रम पवित्र भूमीचे प्रतीक आहे. या आश्रमात ६०० वर्षांचे जुने वडाचे झाड आहे. त्यात एका ज्ञानी महात्म्यांची समाधीही आहे. असे म्हटले जाते की, हे महात्मा कित्येक वर्ष तिथे राहत होते. परमहंस नित्यानंदांनी स्वत: या जागेचा शोध घेतला आहे. १ जानेवारी २००६ साली २६व्या वाढदिवसानिमित्त बेंगलोरस्थित बिडदी येथे आध्यात्मिक गुरू आणि राजनीतिज्ञ यांच्या उपस्थितीत परमहंस नित्यानंद ध्यानपीठमची विधिपर्वक प्रतिष्ठापणा केली.

315
परमहंस श्री नित्यानंदर्जीचा परिचय
आज, परमहंस नित्यानंद जगामध्ये लाखो लोकांमध्ये स्फूर्तिदायक व्यक्तिमत्त्व दरले आहेत. त्यांनी सर्वांसाठी आपल्या सत्याच्या अनुभवातुन आनंदमय राहण्याची प्रक्रिया तयार केली आहे.
त्यांनी घडविलेल्या प्रक्रिया आपल्याला शारीरिक व मानसिकरीत्या आध्यात्मिक शक्ती प्रदान करतात. अल्पावधीतच जगातील लाखो लोकांनी स्वत:मध्ये पूर्णत: बदल झाल्याचा अनुभव घेतला आहे.
ते आपल्याला नाविण्यतेने व पूर्ततेने जीवन जगण्यासाठी, अंतर्प्रेरणेपेक्षा किंवा बुद्धिमत्तेपेक्षा हुशारीने व तत्कालीन ज्ञानाने कसे जगावे याबाबत मार्गदर्शन देतात. बाहेरील जगात अतिशय उत्तम प्रकारे कसे वागावे व अंतर्मय जगात कसे राहावे याचे एकाच वेळी ज्ञान प्रदान करतात. त्यांचे कार्यक्रम आपल्याला सहजपणे ध्यानधारणा करून आनंदमय राहण्यास शिकवितात.
परमहंस नित्यानंद म्हणतात, ध्यानधारणा ही गुरुकिल्ली आहे. जी तुम्हाला बाहेरील जगतात यश व अंतरात्माला पूर्तता मिळवून देते. कमी वेळेमध्ये त्यांच्या ध्यानधारणेच्या उत्तम क्रिया व मार्ग आपल्यामध्ये जाणीव धडविण्यास, तसेच वाढविण्यास मार्गदर्शन करतात.
परमहंस नित्यानंदांनी जगातील शास्त्रज्ञ व रिसर्च करणाऱ्या व्यक्तींसमवेत शास्त्रीय पद्धुतीने कार्य करून या चमत्कारित ज्ञानाचे संशोधन करण्यास मदत केली आहे. मेडिकल सायन्समध्ये आपल्या स्वतःच्या ज्ञानतंतुवर प्रयोग करून जगाकरिता उत्तम उदाहरण दिले आहे. या अदुभुतमय प्रयोगामुळे शास्त्रज्ञांना हृदयरोग, कॅन्सर, गुडघेदुखी, दारूचे व्यसन इत्यार्दीवर प्रयोग करण्यास वाव मिळाला.
