Books / His name is Nithyananda Marathi merged

5. मूर्ती आणि पूजा

# मूर्ती आणि पूजा

'पूजा कधी मूर्तीची होत नाही, ती तर मूर्तीच्या माध्यमातून होते. ' - परमहंस नित्यानंद

परमहंस नित्यानंद घरी एका छोट्या चौरंगावर जिवंत वाटणाऱ्या देवी-देवतांचे मोठ्या भावनेने तल्लीन होऊन पूजा करत असत. कधी कुठेही पूजेसाठी जाताना ते नेहमी या पाच देवी-देवतांच्या समुहाला बरोबर घेऊन जात असत.

परमहंस नित्यानंद पूजेचे साहित्य, तसेच देवी-देवतांच्या मातीच्या मूर्ती तयार करून त्यांना सजवून, नटवून त्यांची पूर्ण श्रद्धेने पूजा करीत असत. मंदिरांचे शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या तिरुवन्‍नामलाईतील जवळपासच्या गावांत परमहंस नित्यानंदांनी, तसेच त्यांच्या मित्र्रांद्वारे उत्सवासाठी तयार केलेल्या अनेक कलाकुसरी बघायला मिळतात.

आज

9परमहस नित्यानंद सेक्रेड आर्ट्स प्रिझरवेशन" नित्यानंदाजींचे एक विशेष लक्ष्य आहे जे मनुष्य प्राण्यासाठी इंडियन टेम्पल हेरिटेजला समर्पित करत आहेत. पाषाण, काष्ठ, तसेच संगमरवरीचे देव-देवता, द्रविड शैलीतली निमार्णिक मंदिर, धातुच्या शिलावरती केलेले कार्य, देवतांची लाकडाची बनवलेली वाहने, मंदिराचे दागिने,

तसेच वेशभूषा, पूजेला अर्पण करण्याची इत्यादी प्रत्यक्ष परमहंस नित्यानदांच्या निर्देशनाखाली तयार केले जाते. या दिव्य लक्षाला सहयोग देण्यासाठी कुशल भारतीय शिल्पकार अनत कृतज्ञतेच्या बरोबर आपले जीवन समर्पित करतात.

गणपतीला जेवण

परमहंस नित्यानंदजी गणपतीच्या मूर्तीला रोज जेवणाचा नैवेद्य दाखवत असत. दाखविलेला नैवेद्य खाण्यासाठी ते गणपतीला विनंती करत व कधी कधी ओरडत असत. एक दिवस त्यांनी एका मुलाची पौराणिक गोष्ट वाचली. तो मुलगा मुर्तीला जेवण देतो तेव्हा ती मूर्ती खरोखरच जेवण जेवत असे. दाखवलेला नैवेद्य गणपतीला खायला लावायचेच हा दृढ निश्चय त्यांनी केला. नित्यानंदांनी असे दरवले की, आता ते कधीच ओरडणार नाहीत. त्याऐवजी गणपती आपण वाढलेले जेवण जेवत नाही तोपर्यंत त्यांनी अन्नग्रहण करण्याचे बंद केले.

तीन दिवस संपल्यानंतर दाखवलेला नैवेद्य गायब झाला. यावर ते खुप खुश होऊन गणपतीकडे त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

वयाच्या १२व्या वर्षी परमहंस नित्यानंदांनी दिव्यदुष्टीद्वारे पार्वतीची सोन्याची मूर्ती अरुणाचलेश्वराच्या मंदिरात पाहिली. त्यांच्या मनावर त्या मूर्तीचे चित्र खोलवर उमटले. त्यांनी तांब्याचा पत्रा घेऊन, त्यावर मनात

उमटलेले चित्र नखांनी काढले.

तेच पवित्र असे श्री चक्र होय.

ब्रह्माण्डात हे श्री चक्र शक्तिशाली

व गूढ असे मानले जाते. कौशल्यवान कलाकारानाही गोंधळात टाकणारे हे कठीण

चित्र तुम्ही कसे काय बरे काढलेत, हा प्रश्न परमहस श्री चक्र नित्यानदाना विचारले असता,

नित्यानंदाजींनी सांगितले, हे फक्त नऊ त्रिकोन आहेत, जे विविध कोनांत एकमेकांसमोर बसविलेले आहेत. एकदा तुम्हाला त्याचे तत्त्व समजले की, समजायला सोपे जाईल.

आज

विश्वभारात नित्यानदाद्वारे सुजित मंदिरात विशाल पूजा-अर्चा था श्रेष्ठ समजुतीने केली जाते. पुजा एक आध्यात्मिक पद्धती आहे, जी निसर्गाशी जोडली आहे.

'बौद्धिक श्रद्धाशक्ती ही मानसिक व शासीरिक शक्तीपेक्षा जास्त श्रेष्ठ आहे.'

-परमहंस नित्यानंद

माताची कुप्पाम्मल - एक प्रेरणेचा रत्रोत

अरुणाचलमध्ये ब्रह्मयोगिनी विभुधानंदादेवी माताजी कुम्पाम्मल नित्यानंदांच्या सुरुवातीच्या काळात त्यांची देखभाल करीत असत व त्याचबरोबर त्यांना आध्यात्मिक मार्गसूद्धा दाखवित असत. बारा वर्षांच्या बाल्यावस्थेमध्ये जेव्हा त्यांना आध्यात्मिक अनुभव येऊ लागले तेव्हा माता कुप्पाम्मलांनी त्यांच्या वाढत असलेल्या चेतनेबद्दल सविस्तरपणे समजावून शारीरिक व मानसिक रूपाने त्यांचा सांभाळ केला. त्याचबरोबर दूरदृष्टीचा विचार करून त्यांनी त्यांना वेगवेगळ्या आध्यात्मिक अभ्यात्माचे प्रशिक्षण दिले.

कुप्पाम्मल व परमहंस नित्यानंद

आध्यात्मिकता वाढविणारे इसाक्की स्वामीगल

इसाक्की स्वामीजी आध्यात्मिकतेला वाव देत असत. एक ज्ञानी महापुरुष इसाक्की स्वामीजी म्हणजे तरुण परमहंस नित्यानंदांच्या प्रेरणेचे मुख्य बळ होते. अनेक ज्ञानी महापुरुषांचे सानिध्य प्राप्त करणारे भाग्यशाली परमहंस नित्यानंदाजींचे सुरुवातीचे जीवन या महापुरुषांचे जीवन कशा प्रकारे परमानंदामध्ये कसे लीन होते हे पाहण्यात व्यतित केले. या महापुरुषांना परिपूर्णतेने भरलेले पाहून व त्यांच्या साधेपणाने मोहित होऊन नित्यानंदांमध्येही ही परिपूर्णता प्राप्त करण्याची तीव्र इच्छा जागृत झाली.

इसाक्की स्वामीगल

आत्म-पुराण (एक उपनिषद्), इसाक्की स्वामीगलांनी दिलेली भेट म्हणून दिलेले पुस्तक परमहंस नित्यानंदांच्या आध्यात्मिक शिक्षणाची सुरुवात दर्शविते.

ओलई चुवाडी(ताडाच्या जातीच्या झाडाच्या पानावर तयार केलेली पांडुलिपी)मध्ये प्राचीन वैदिक भजन समाविष्ट आहेत, जे परमहंस नित्यानंदाजींना इसाक्की स्वामीजींकडून भेट स्वरूप प्राप्त झाले.

योगी रामसूरतकुमार एक रहस्यमय बंधन

योगी रामसूरत कुमार किंवा विश्री स्वामीजी एक ज्ञानी पुरुष होते. तिरुवन्नमलाईमध्ये भगवान श्री रमण महर्षीच्या बरोबरीच होते. तिरुवन्नमलाईमध्ये ते एक सुप्रसिद्ध ज्ञानी पुरुष होते, ज्यांच्यावर सगळे जण प्रेम करीत असत. परमहंस नित्यानंद नियमितपणे त्यांना भेटण्यासाठी येत असत.

योगी रामसूरतकुमार थेरमुट्टीजवळील मंदिराचा रथ उभे करण्याच्या जागेपासून इमारतीच्या जिन्यापर्यंत कचरा एकत्रित करीत असत आणि एका भिक्षुकासारखे त्याजवळ बसत असत. लोकांचा एक नियमच बनला की, येता-जाता तेथे थांबुन आपल्या भविष्याबद्दल त्यांना ते प्रश्न विचारत असत. शाळेची मुलेसुद्धा तेथे थांबून आपण परीक्षेत पास होणार का, म्हणून विचारीत असत. त्यांना कधी कधीच योगी म्हणून प्रतिक्रिया मिळत असे. एक दिवस परमहंस नित्यानंद शाळेत जाताना तेथे थांबले आणि त्यांना विचारले की, 'आज ते आपल्या परीक्षेत पास होतील का ? ' त्यांना उत्तर मिळाले, पुत्रा, तू तुझ्या जीवनाची परीक्षा पास करशील. '

आज

तरुण ब्रह्मचारी, तसेच गुरुकुलची मुले दिनचर्येच्या रूपात परमहंस नित्यानंदजीच्या आश्रमात वेदांचा जप करतात. उपदेशाच्या स्वरात स्वर मिळवून मुले आनंदमय चेतनेच्या पाळण्यात वाढत आहेत.

परमहंस नित्यानंद त्यावेळेस त्या शब्दांचा अर्थ समजू शकले नाही. एक बाई जी त्यांच्याजवळ बसली होती, हे ऐकून ती म्हणाली की, जा मुला! आता हे शब्द तुला कळणार नाहीत, परंतु वेळ आल्यावर या शब्दांचे महत्त्व नक्कीच कळेल. '

तिरुवन्नमलाईमधील उत्सवामध्ये योगी रामसूरत कुमार

अन्नामलाई स्वामीजी आणि क्लेषकारक जखम

सत्यावर प्रयोग करण्याचे धेर्य हीच अनुभवाची चावी आहे.' - परमहंस नित्यानंद

अन्नामलाई स्वामीगल

अन्नामलाई स्वामीजी हे भगवान श्री रमण महर्षी यांचे शिष्य होते. परमहंस नित्यानंदांनी वयाच्या दहाव्या वर्षी तिरुवन्नमलाई येथील रमण महर्षींच्या आश्रमामध्ये जाण्यास सुरुवात केली. व्याख्यान सत्र चालू होण्याच्या प्रारंभास ते अन्नामलाई स्वामीगल यांच्या शिष्यांबरोबर नियमितपणे जात असत. अन्नामलाई स्वामीगल यांचे व्याख्यान संपल्यानंतर आनंदित होऊन मिठाई वाटत असत.

अन्नामलाई स्वामीजींनी आपल्या शिष्यांना मोह-माया यांच्या संबंधित व्याख्यान दिले. त्यामध्ये त्यांनी असे सांगितले की, आपले जे हे शरीर आहे ते शरीर नाही तसेच ते वास्तविकताही नाही. जे वास्तविक आहे तो फक्त आपला आत्मा आहे. आपल्या आत्म्यावर कुठल्याही प्रकारची पीडा किंवा करणी, चेट्रक, भानामती यांचा काहीही परिणाम होत नाही, म्हणूनच आपला आत्मा दु:ख, कष्ट व कुठल्याही रोगापासून फारच दूर राहतो.

महाराजांचे हे शब्द आपल्या कानावर पडताच, परमहंस नित्यानंद त्याच दिवशी आपल्या घरी परतले. त्यांनी स्वयंपाकघरात जाऊन चाकू घेतला. त्यांना हे पाहायचे होते की, खरोखरच आपल्या शरीराला वेदना होतात की नाहीत. यासाठी त्यांनी आपल्या पायाच्या डाव्या मांडीवर चाकुने जखम केली, परंतु याचा परिणाम वेगळाच झाला. कारण त्यांच्या मांडीला जखम तर झालीच त्याचबरोबर शरीराला पुष्कळ वेदनाही झाल्या. त्याचबरोबर आईचा रागही सहन करावा लागला, हे वेगळेच. डॉक्टरांकडून त्यांच्या मांडीला टाकेही घालावे लागले.

त्यानंतर परमहंस नित्यानंदांनी महाराज अन्नामलाई स्वामीजींजवळ जाऊन त्याविषयाबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अन्नामलाई स्वामीगल महाराजांनी त्यांना असे सांगितले की, तुमच्या शरीराच्या वेदना कमी होतील यासाठी मी तुम्हाला अभ्यास करण्याची एक पद्धत सांगतो. सत्यावर प्रयोग करण्याचे तुमचे धैर्य हे तुम्हाला ज्ञानप्राप्तीकडे घेऊन जाईल. या घटनेनंतर परमहंस नित्यानंद महाराज यांची ज्ञान संशोधनाबद्दलची दुष्टी खुपच खोलवर गेली.

आज

आज परमहंस नित्यानंद करोडो लोकांसाठी प्रेरणेचे स्थान बनले आहेत. या महापुरुषाच्या फक्त दर्शनाच्या हेतुने लोक मोठ्या संख्येने गर्दी करतात.

अंगकोर वट, कम्बोडिया

आत्म्याचा विकास

ध्यान एक अशी प्रमुख चावी आहे की त्या चावीने आपल्या अंतर्मनाची द्वारे स्वोलली जातात.'

  • परमहस्म नित्यानाद

Section 2

अरुणाचल हे परमहंस नित्यानंद यांच्यासाठी सर्व काही होते. अशी कुठलीच जागा शिल्लक राहिलेली नाही की. त्यांचा त्या भागातील दर्‍या-खोऱ्या. डोंगर यांना स्पर्श झालेला नाही. ते रोजच आपल्या परमप्रिय अरुणाचलच्या कुशीत ध्यानावस्थामध्ये लीन होऊन जात असत. त्यांचे शरीर दुर्बल होते, परंतु त्यांचे डोळे सदैव तेजस्वी राहत असत जसे काही अंतराळातील प्रकाशाला न्याहाळीत आहेत. (रघुपती योगी आणि कुप्पाम्मला यांनी प्रत्यक्ष दूरदृष्टी ठेवून नित्यानंद महाराजांच्या ध्यानावस्थेची अनेक चित्रे घेतली आहेत.) परमहंस नित्यानंद वेगळ्या ध्यान कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला ध्यानावस्थेपर्यंत पोहोचवतात. ते प्रत्येक साधकाला आनंदित होण्यासाठी सुजित करतात.

आज

परमहंस नित्यानंद वेगळ्या ध्यान कार्यक्रमाच्या माध्यमात्तुन प्रत्येक व्यक्तीला ध्यानावस्थेपर्यंत पोहोचवतात. ते प्रत्येक साधकाला आनंदित होण्यासाठी सुजित करतात.