प्रस्तावना
This text was machine-transcribed from the printed book and may contain errors. Select the words and choose “Report a mistake”.
मनुष्य बाहेरील संसारात पाहिजे ते प्राप्त करीत असतो, परंतु अंतिम शोध तर शांती व आनंदाची प्राप्ती आहे. या अस्तित्वस्थरावर तो परिपूर्णता प्राप्त करतो. जेव्हा तो ही तहान ओळखतो, तेव्हा स्वतः ज्ञान प्राप्त करण्यासाठी तयार होतो. पूर्वेने अशा हजारो ज्ञानीयांना जन्म दिला आहे, ज्यांनी या परमानंदाच्या प्राप्तीचा मार्ग माणसांना दाखविला आहे.
असेच ज्ञानींच्या रूपाने आज परमहंस नित्यानंद स्वामी या संसाराला ज्ञानाने प्रकाशित करीत आहेत. आध्यात्मिक ज्ञानाने परिपूर्ण परिवेशात जन्मलेल्या स्वामीजींनी तीन वर्षांच्या बाल्यावस्थेपासून सत्याच्या तीव्र लालसेने हठयोग, मनशरीर-आत्मा यांची एकजुटता, ध्यान, तंत्र, वेदान्त आणि अन्य पूर्वी तत्त्व-मीमांसा विज्ञान यावर प्रयोग करण्यास सुरुवात केली. ज्ञान प्राप्त करण्यापूर्वी त्यांनी हजारो आध्यात्मिक पद्धतींचा अभ्यास केला.
एकचित्त होऊन ज्ञानप्राप्तीचे लक्ष प्राप्त करणारे स्वामीजी आज जगभरातील करोडो लोकांसमोर विस्मय प्रेरणा व्यक्तिमत्त्वाचे स्रोत बनले आहेत. ते ध्यान कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना सुस्पष्टता, आध्यात्मिक बुद्धी आणि जीवन समाधान प्रदान करतात, ज्यामुळे लोकांमध्ये ज्ञानप्राप्तीचा विश्वास जागृत होतो. आजच्या तरुणांमध्ये ते स्वतःवर प्रयोग करणे व ज्ञानप्राप्ती करण्याची आश्चर्यजनक संभावना पाहतात.
परमहंस नित्यानंद स्वामीजींचे लक्ष्य लोकांना स्वतःला जागृत करणे व उच्चता प्राप्त करण्यामध्ये सहाय्यता प्रदान करणे आहे. पृथ्वी ग्रहावर नित्य आनंदच्या विज्ञानाला पुनर्स्थापित करणे, हेच त्यांचे लक्ष्य आहे. ते लोकांना त्यांच्या आत लपलेल्या शक्तीला ओळखण्यास मदत करतात, ज्यामध्ये त्यांना ज्ञान प्राप्त होऊ शकते. ते म्हणतात, ‘आम्हाला एक असा ज्ञानी समाज तयार करायचा आहे की, ज्यांचा सत्यावर दृढ विश्वास असेल. विज्ञान आणि अध्यात्माला एकत्र करण्यासाठी ते वैज्ञानिकांबरोबरसुद्धा काम करतात.’
हे पुस्तक परमहंस नित्यानंद स्वामींची ज्ञानप्राप्तीची झलक प्रस्तुत करते. रोचक घटना, तसेच सत्य माध्यमातून शब्दांच्या मागे लपलेल्या अनुभवातून वाचकांचे ध्यान आकर्षित करतात. म्हटले जाते की, एक ज्ञान प्राप्त महापुरुषाची जीवनगाथा, एका साधारण मनुष्यात उत्तम जीवनशैलीच्या मदतीने अध्यात्म, तसेच स्वयंज्ञान प्राप्त करण्याची गहन इच्छा विकसित करते. या..., हे पुस्तक वाचून या पृथ्वी तलावर या महापुरुषाच्या प्रोत्साहित झळकांचे दर्शन करा.
परमहंस नित्यानंदांची विस्तृत जीवनगाथा वाचण्यासाठी कृपया परमहंस नित्यानंद अंक १ खरेदी करा. यामध्ये १७ वर्षांपर्यंतच्या आयुष्यर्यंतचे विस्तृत वर्णन केले आहे. उरलेले अंकसुद्धा लवकरच प्रकाशित होतील. प्रकाशक
