KAILASA Library/परमहंस नित्यानंद ज्यांचे नाव आहे!/ज्ञानप्राप्ती होण्याच्या आरंभीच्या दिवसांमध्ये ...Sign in
परमहंस नित्यानंद ज्यांचे नाव आहे!

ज्ञानप्राप्ती होण्याच्या आरंभीच्या दिवसांमध्ये ...

This text was machine-transcribed from the printed book and may contain errors. Select the words and choose “Report a mistake”.

असीम सत्तेच्या अदृश्य हातांनी मार्गदर्शन घेतेवेळी परमहंस नित्यानंद हे ओंकारेश्वर(मध्य प्रदेश) ते तामिळनाडू(दक्षिण भारत)दरम्यान अल्प काळासाठी कावेरी नदीकाठी थांबले. भक्तजनांनी आणलेले भोजन ग्रहण केल्यानंतर आणि खुल्या आकाशात किंवा झोपडीमध्ये राहून, एकांतात किंवा जनसमुदायात पूजा, हवन इत्यादी कार्य करीत राहिले. त्यांनी लोकांना ध्यान करायला शिकविले आणि त्यांचे जीवन सुखी करण्यासाठी साहाय्य केले. या तरुण स्वीमीजींच्या रोग बरे करण्याच्या (हीलिंग) चमत्कारिक शक्तीबद्दलची माहिती जंगलात लागलेल्या आगीप्रमाणे सर्वत्र पसरली.

एक स्वप्न पूर्ण झाले

`मी परमानंद प्राप्त करण्याची पद्धत शोधली आहे. माझा उद्देश प्रत्येक मनुष्याने हा अनुभव करायचा आहे की जो वेगळ्या प्रकारचा आहे, अनंत आहे आणि परम आनंदच त्यांचा यथार्थ स्वभाव आहे.'

  • परमहंस नित्यानंद
परमहंस नित्यानंद

परमहंस नित्यानंदांना आश्रमाच्या जागेबाबत पहिलेच स्वप्न दर्शन झाले होते. बेंगलोरच्या सीमेत पसरलेले व्यापक आश्रम पवित्र भूमीचे प्रतीक आहे. या आश्रमात ६०० वर्षांचे जुने वडाचे झाड आहे. त्यात एका ज्ञानी महात्म्यांची समाधीही आहे. असे म्हटले जाते की, हे महात्मा कित्येक वर्षे तिथे राहत होते. परमहंस नित्यानंदांनी स्वतः या जागेचा शोध घेतला आहे. १ जानेवारी २००६ साली २६व्या वाढदिवसानिमित्त बेंगलोरस्थित बिडदी येथे आध्यात्मिक गुरू आणि राजनीतिज्ञ यांच्या उपस्थितीत परमहंस नित्यानंद ध्यानपीठम्‌ची विधिपूर्वक प्रतिष्ठापणा केली.

आज

परमहंस श्री नित्यानंदजींचा परिचय

परमहंस श्री नित्यानंदजी

आज, परमहंस नित्यानंद जगामध्ये लाखो लोकांमध्ये स्फूर्तिदायक व्यत्तिमत्त्व ठरले आहेत. त्यांनी सर्वांसाठी आपल्या सत्याच्या अनुभवातून आनंदमय राहण्याची प्रक्रिया तयार केली आहे.

त्यांनी घडविलेल्या प्रक्रिया आपल्याला शारीरिक व मानसिकरीत्या आध्यात्मिक शक्ती प्रदान करतात. अल्पावधीतच जगातील लाखो लोकांनी स्वतःमध्ये पूर्णतः बदल झाल्याचा अनुभव घेतला आहे.

ते आपल्याला नाविण्यतेने व पूर्णतेने जीवन जगण्यासाठी, अंतर्प्रेरणेपेक्षा किंवा बुद्धिमत्तेपेक्षा हुशारीने व तत्कालीन ज्ञानाने कसे जगावे याबाबत मार्गदर्शन देतात. बाहेरील जगात अतिशय उत्तम प्रकारे कसे वागावे व अंतर्मय जगात कसे राहावे याचे एकाच वेळी ज्ञान प्रदान करतात. त्यांचे कार्यक्रम आपल्याला सहजपणे ध्यानधारणा करून आनंदमय राहण्यास शिकवितात.

परमहंस नित्यानंद म्हणतात, ध्यानधारणा ही गुरुकिल्ली आहे. जी तुम्हाला बाहेरील जगतात यश व अंतरात्माला पूर्णता मिळवून देते. कमी वेळेमध्ये त्यांच्या ध्यानधारणेच्या उत्तम क्रिया व मार्ग आपल्यामध्ये जाणीव घडविण्यास, तसेच वाढविण्यास मार्गदर्शन करतात.

परमहंस नित्यानंदांनी जगातील शास्त्रज्ञ व रिसर्च करणाऱ्या व्यक्तींसमवेत शास्त्रीय पद्धतीने कार्य करून या चमत्कारित ज्ञानाचे संशोधन करण्यास मदत केली आहे. मेडिकल सायन्समध्ये आपल्या स्वतःच्या ज्ञानतंतूवर प्रयोग करून जगाकरिता उत्तम उदाहरण दिले आहे. या अद्भुतमय प्रयोगामुळे शास्त्रज्ञांना हृदयरोग, कॅन्सर, गुडघेदुखी, दारूचे व्यसन इत्यादींवर प्रयोग करण्यास वाव मिळाला.

Paramahamsa Nithyananda