1. From Pain to Bliss
वेदनेचा इलाज काय आहे?
तर तुमच्या ध्यानाच्या अनुपस्थितीत वेदना जाणवीत असेल तर तिचा इलाज म्हणजे तुमची उपस्थिती आहे. आजारी अवयवांमध्ये तुमच्या उपस्थितीकरिता रस्ता बनविणारी एक साधारण व सुंदर स्व-निरामय असे ध्यानाचे तंत्र आहे. पुढच्या वेळेस तुम्हाला कधी वेदना जाणवू लागेल तेव्हा याचा प्रयोग करा. उदाहरण : पायाची वेदना. वेदनाशामक औषधांच्या तुलनेत निश्चितच हा एक चांगला इलाज आहे. वेदनाशामक औषधांचा अप्रत्यक्ष परिणाम कधी कधी मूळ तकारीपेक्षाही वाईट होतो.
ध्यान : एका काळोख्या खोलीत झोपा. आपल्या संपूर्ण शरीराला विसरण्याचा सचेत प्रयत्न करा. जिथे वेदना असेल त्या अंगांवर आपले लक्ष केंद्रित करा. दुखणाऱ्या अवयवाची जाणीव होताच, जाणूनबुजून आपल्या मेंदूतून वेदना किंवा दुखणे शब्द त्याग करण्याचा प्रयत्न करा. तुमची मानसिक बडबड तुम्हाला सतत सांगण्याचा प्रयत्न करील की तुम्हाला वेदनेची जाणीव होत आहे. ती बंद करा. खोल जाऊन जाणीव घ्या, मोकळ्या मनाने अनुभव घ्या. तुमच्या मेंदूत झाकण्याचा प्रयत्न करून तेथे काय चालले आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला लगेचच जाणीव होईल की तुमचा मेंदू वेदना वाढवून बघत आहे.
तुमची पूर्ण जागरूकता वेदनेच्या केंद्रावर आणा आणि असे केल्यावर हे त्वरितच आकुंचित होऊन वेदनेच्या अगदी केंद्रबिंदूबर खूप लहान होऊन जाईल.
संपूर्ण स्वरूपात त्याच केंद्र बिंदूबर लक्ष केंद्रित करा व अचानक एका क्षणाला तुम्हाला जाणीव होईल की तुमची वेदना नष्ट झाली आहे व त्याची जागा घेतली आहे आनंदाने, परम सुखाने. अर्थात बेदना वा दु:ख आणि आनंदाचे मूळ एकच असल्याकारणास्तव ही एकाच जाणिवेची दोन रूपे आहेत. तुम्ही जर तुमच्या मित्राकडून किंवा व्यावसायिक मालिश करणाऱ्याकडून मालिश करवून घेतली असेल तर तुम्हाला हीच मालिश एका अनोळखी हातांनी केली तर अगदी शारीरिक हिंसा वादू लागते!
तुम्ही जर तुमच्या अनुभवाच्या सत्याला समजण्याचा प्रयत्न कराल तर ते सत्य असेल की वेदनेचे कोणतेही अस्तित्व असत नाही. वेदना वा दु:खाचे केवळ नकारात्मक अस्तित्व असते.
अंधाराप्रमाणेच, ही केवळ एक अनुपस्थिती आहे - जागरूकतेची अनुपरिशती. ज्याप्रमाणे उजेड येताच अंधार आपोआप नष्ट होतो त्याप्रमाणे जेव्हा जागरूकतेची ऊर्जा वेदनेवर केंद्रित होते तेव्हा वेदना आपोआप गायब होते. या प्रकारच्या ध्यानामुळे कोणत्याही प्रकारची वेदना दूर होऊ शकते. मी तुम्हाला याचा स्वतः अनुभव घेण्यास आमंत्रित करतो आहे, ध्यानाद्वारे तुमच्या दुखण्यावर मार्ग मिळवा व तुमच्या अंतरात्म्यामध्ये प्रवेश करण्यासाठी त्याला साधन बनवा. तुम्हाला जाणीव होईल की वेदना हेच आनंदाचे दार बनले आहे.
वेदना वा द्रःख एक मौल्यवान अध्याय असू शकतो
धेन व्यक्ती - एक ज्ञानी व एक सामान्य मनुष्य काळोख्या अमावस्येच्या रात्री जंगलातून जात असतात. अचानक आकाशात वीज चमकते. सामान्य मनुष्य भीतीने थरथरू लागतो. एक वादळ! त्याचा मस्तक तात्काळ गोंधळात पडतो. तो चालत राहील का? किंवा वादळ थांबेपर्यंत तो एखादे सुरक्षित ठिकाण शोधू शकेल? तो मनुष्य विचार करतो की आपण प्रवासाला निघण्याचे ठरविले नसते तर बरे झाले असते. तो स्वतःला मूर्ख व कमनशिबी समजू लागतो. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, तो दु:खाच्या वेळी कोलमडून पडला. दुसरीकडे ज्ञानी मनुष्याने त्या क्षणाचा उपयोग पुढच्या रस्त्यावर चांगली नजर टाकण्याकरिता केला. त्याने खात्री करून घेतली की ते योग्य दिशेनेच प्रवास करीत आहेत. चमकल्याबद्दल विजेचेच आभार मानले आणि पुढचा प्रवास सुरू केला.
वेदना ही चमकणाऱ्या विजेप्रमाणे आहे. त्याच्या अस्तित्वावर तुमचे कोणतेच नियंत्रण नसते. पण त्यातून दुःख मिळवायचे की एखादी शिकवण मिळवायची हे पूर्णतः तुमच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. तुम्ही हे समजून जाल की तुमच्या दु:खाचे कारण तुम्ही स्वत:च आहात व समाधानी केवळ तुम्हीच होऊ शकता.
जेव्हा तुम्ही बेदना वा दु:खाकडे लक्षपूर्वक पाहाल तेव्हा आणोआप एक निरागसता तुम्हाला जाणवेल. पहिल्यांदाच तुम्हाला जाणवेल की तुम्ही शरीर नाही आहात. कोणतीच बेदना वा दु:ख बास्तवात तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. एकदा तुम्हाला समजेल की तुम्ही वेदनेपासून अनभिज्ञ आहात तेव्हा वेदनेला तुम्ही दु:खाचा भूतकाळ (जो दु:खांपासून अनभिज्ञ झालेला आहे) बनविण्यासाठी मागे सोडून जाल. आयुष्यभर वाहून आणलेले शरीर त्या शरीराच्या विलग होण्याने प्राप्त होणाऱ्या दुर्ल्र्भ मुक्तीची तुम्हाला जाणीव होईल. तुम्ही तुमच्या ऐहिक जीवनाला मागे सोडून जाता आणि आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करता. त्यावेळी तुम्ही एका आत्मन (आलोकित गुरू)च्या स्वरूपात जिवंत राहता. संपूर्ण भौतिक जग विलिन होते आणि एक नवे जग समोर येते - अद्वितीय सुंदरता, निरागसता, आनंद व सहयोगाचे जग.
गीतेमध्ये सांगितलेले आहे :
। सम द्रःख सुख स्वास्थ्य सम लोशताशमा कांचनः । । तुल्या प्रियाप्रियो धीरा स्थुल्या निन्दात्मा समस्तुति ।
(तो जो स्वमध्ये सामील आहे, निराशा वा आनंद एकच मानतो, मातीचे ढेकूळ, दगडाचा तुकडा वा सोन्याचा तुकडाही समान समजतो, तो ज्ञानाने प्रभावित होतो, सुखद व दु:खद दोन्ही घटनांना एकसमान उत्साहाने सामोरा जातो, एकसमान दृष्टीने दोष पाहतो व गुणगान करतो) ज्ञान व ध्यानाद्वारे जागरूकता व अभ्यासाद्वारे, वेदना वा दुःख नित्यानंद, स्थायी परम सुखात प्रवेश करण्याचे जादुई द्वार बनू शकते. माझा आशीर्वाद नेहमीच तुमच्याबरोबर राहो.
... प्र. वेदना व दु:खाच्या दुनियेतून बाहेर येण्याचा एकमेव मार्ग आत्मज्ञानी होणे हाच आहे काय ?
आपल्याला एक गोष्ट पहिले समजून घेतली पाहिजे : आत्मज्ञानी होणे म्हणजे वेदने पासून दूर जाणे नाही. ह्याच्या व्यतिरिक्त, वेदनेची प्रकृतिची पोहोच, 'मी का दुखी आहे? माझ्यामध्ये असे काय आहे जे, ह्या बेदनेचे कारण आहे?' की खोलवर किंवा संपूर्ण समज यांच्या कारणने त्याचा जन्म झाला आहे.
फक्त वेदनेचे स्वरूप व कारणांना प्रबळ अंतर्गत स्पष्टतेने पाहा, वेदना स्वेच्छेने संपविण्यास हे करण्यास बाध्य करेल कारण तुमच्याकडे राहण्यासाठी त्याच्याकडे काही कारणच राहत नाही तसेच हा आभास आपल्यासमवेत संपूर्ण परम सुखाची अवस्था आणतो. ज्याद्वारे ज्ञान आलोकाने आलोकित होते. यालाच आत्मज्ञान म्हटले जाते.
आलोकित अवस्था पहिल्यांदा आपल्याला खरे सुख व आनंद पाहण्याची परवानगी देते. पहिले आपण ज्याला खरे सुख आणि संतोष समजत होतो ते तसे नाही. आलोकित अवस्था आपल्यवर वास्तविक परमसुख व परमानंदाचा वर्षाव करते. तुम्हाला ते वास्तवाची चव प्राप्त करून देते.
पण लक्षात ठेवा, वेदनेची सीमा जोपर्यंत तुम्ही पार पाडत नाही तोपर्यंत यापैकी काहीही होऊ शकत नाही. वेदनेच्या संपूर्ण शुंखलेची पूर्ण जाणीव - आलोकित अवस्था निश्चितच वेदना वा दुःखापासून वाचण्याचा मार्ग नाही.
एका प्रकारे, ज्या वेदना वा दुःखाचा तुम्ही अनुभवता त्याचे धन्यवाद मानण्याची आवश्यकता आहे - ही बाब तुम्हाला सत्य आणि उत्तमतेच्या शोधाची प्रेरणा देते.
प्रश्न : जेव्हा कोणी माझा अपमान करतो तेव्हा मला लगेचच राग येतो व माझ्या मनाला वेदना होतात. यापासून माझा बचाव कसा करू?
थुम्ही यापासून दूर पळण्याचा प्रयत्न का करता ? जेव्हा वेदना, राग, अपमान दाबला जातो तेव्हा तो नेहमीच तुमच्यामध्ये दबलेल्या स्वरूपात वास करीत असतो. दबलेल्या भावना धोकादायक असतात - थोडासा राग, थोड्याश्या वेदनेची जाणीव पुढेपुढे वाढत जाऊन खोलवर व कायमस्वरूपी द्वेषात बदलून जातात.
त्याऐवजी, तुमचे मूल्यांकन केल्याशिवाय आपल्या भावनांचा स्वीकार करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जखम झाली आहे का? याच वेळी वेदनेच्या जाणिवेत पूर्णतः प्रवेश करा. त्यापासून वाचण्याचा प्रयत्न करू नका, त्याला नकारू नका. आपल्या स्वतःशीच सहानुभूतीने वागू नका, ज्या व्यक्तीने तुम्हाला वेदना दिली त्याच्या विरोधात दिशा निर्धारित करू नका - केवळ तुमच्या भावनांकडेच पहा की कोणत्या प्रकारे ती तुमच्या तंत्राशी खेळत आहे. यासाठी एक क्षणही लागू शकतो किंवा काही तासही लागू शकतात. एवढेच कशाला, काही दिवसही लागू शकतात. पण तुम्ही असा काही बदल अनुभवाल ज्याची तुम्ही कल्पनाही केलेली नसेल. जे काही असेल ती भावना ऊर्जा आहे, प्रचंड ऊर्जा! किती वेळ अपरिष्कृत ऊर्जा तुमच्या तंत्रामध्ये फिरत राहू शकेल? ज्या क्षणी कोणत्याही प्रकारच्या अस्वीकृतीशिवाय तुम्ही वेदनेला स्वीकार कराल, तुमच्या जीवनात तिच्या भूमिकेचे स्वागत कराल त्या क्षणी वेदनेची संपूर्ण गुणवत्ता बदलून जाईल. तीच ऊर्जा जी वेदना, राग, दु:ख यात असल्याची संवेदना होती ती शांत शक्ती जी आपणा सर्वांमध्ये असते, ती शक्ती बदलून प्रेम व परमसुखाच्या आनंदमय भावनांमध्ये बदलेल.
कुरूपतेला सुंदर बनवू शकते. संवेदना आपले पुरस्कार स्वतः आणते. विश्वास ठेवणे कठीण आहे ना ? जोपर्यंत तुम्हाला स्वतःला अनुभव येत नाही तोपर्यंत विश्वास बसणे कठीण आहे. याकरिता एक संधी द्या!
प्रश्न : वेदना तसेच प्रेम नेहमी बरोबरीनेच का येतात? मी आमच्या नात्यामध्ये माझ्या साधीदाराला खूप मोकळीक देण्याचा प्रयत्न करतो. पण त्याचा गैरफायदा घेतला जाऊन नष्ट होऊन जातो.
सर्वात पहिल्यांदा तुमच्या प्रियजनांना मोकळीक देण्याचा तुमचा विचारच चुकीचा आहे काय ? प्रेमामध्ये एकमेकाला स्वातंत्र्य देणे अभिप्रेत आहे, विनाशर्त स्वातंत्र्य. असे सांगून तुम्ही तुमच्या साथीदाराला एका निश्चित परिमाणामध्ये स्वातंत्र्य देता (जेवढे तुम्हाला योग्य बाटते) तुमच्यात दिसून येते की तुमच्या देण्यामध्ये असे काही आहे जे तुम्हाला रोखू पाहत आहे.
साधारणतः दुःख एक प्रतिक्रिया आहे जी एका विशिष्ट्य परिस्थितीसाठी आपण निवडली आहे
तुमच्या प्रियजनाना तुमच्या ताब्यात ठेवण्याची ओढ स्वाभाविक आहे - हा एक महत्त्वाचा खेळ आहे. याची कल्पना करणे कठीण आहे की कदाचित तुमच्या प्रियजनास तुमच्यापासून दुरावा किंवा वेगळ्या वेळेची
आवश्यकता असू शकते. हो की नाही? तुम्ही तुमच्या प्रेमिकेला स्वातंत्र्य देऊन योग्य गोष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहात - पण जेव्हा वास्तविकरीत्या ती त्या स्वातंत्र्याचा वापर करते, त्या वापर होण्याच्या जाणिवेबरोबरच तुम्ही ते स्वातंत्र्य संपविता. वास्तविक, तुम्ही कधीच विचार केला नाही की ती कधीही त्या स्वातंत्र्याचा प्रयोग आपले काम करण्यासाठी करेल किंवा ती अन्य कोणाबरोबर असेल, तुम्ही कधी असा विचार केला आहे का ?
सामान्य सिद्धांत बनविण्याची चूक करू नका - 'जितक्या वेळी मी तिला आमच्या नात्यामध्ये स्वातंत्र्य देतो, वापरला जातों'.
तुम्हाला खात्री आहे का की चूक तुमची नाही? साधारणतः प्रेमासमवेत वेदनाही येते. याचे कारण आहे - प्रेमी आपल्या आशा-अपेक्षांच्या सोन्याच्या पिंजन्यात अजाणतेषणे एकमेकांना बंद करू इच्छितात. पण खरे प्रेम कधीच कैदेमध्ये फूलू शकत नाही. तुम्ही तुमच्या प्रेमिकेला कैद करण्याचा प्रयत्न कराल व तीसुद्धा पुन्हा-पुन्हा असेच करील - जोपर्यंत, प्रेम करणे एवढे द्र:खदायी असेल तर प्रेम न करणेच चांगले या भावनेसहित तुम्ही ही शंका नष्ट कराल. पण एकदा तुम्ही तुमच्या प्रेमाकरिता स्वतःलाच बंदिस्त केलात तर उरेल काय? प्रेम आनंद व स्वातंत्र्याचे दार असू शकते किंवा ते एक जिवंत नरक बनू शकते. प्रेमाला वेदनेप्रमाणे अनुभवणे म्हणजे प्रेमाच्या मुख्य बिंदूपासून दूर जाणे होय. एक म्हण आहे - तुम्ही जर कोणावर प्रेम करीत असाल तर त्याला स्वतंत्र ठेवा. जर ती व्यक्ती तुमची असेल तर ती तुमच्याकडे परत येईल,
आणि जर ती तुमच्याकडे परत येत नाही तर याचा अर्थ आहे की ती व्यक्त तुमची नव्हतीच! हे करण्याचा प्रयत्न करा - केवळ प्रेमाच्या संबंधामध्ये नाही, तर आपल्या प्रत्येक नात्यामध्ये सुद्धा.
प्रश्न : आपल्या जुन्या कर्मांचे भोग भोगावेच लागतात, अशा प्रकारे आवश्यक दुःखांच्या धारणेसहित भारत मध्ये पालनपोषण होते. दुःख हेच आपल्या जीवनाचा मूलभूत सिद्धांत आहे काय ?
सुरुवातीस, हे समजण्यास तुम्हाला मदत मिळेल की वेदना ही जीवनाची एक अवस्था नसून मनाची एक अवस्था आहे. ये जीवनातील कोणतीही घटना नाही - ही एखाद्या घटनेवर तुमची प्रतिकिया आहे. एखाद्या विशिष्ट स्थितीमध्ये तुम्हाला वेदना होतात की नाही हे तुमच्या प्रतिकियेवर पूर्णत: अवलंबून आहे
तुम्ही वेदनेचा अनुभव केव्हा करता? जेव्हा तुम्ही आजारी असता तेव्हा? जेव्हा तुमचे शेजारी नवीन गाडी खरेदी करतात तेव्हा? जेव्हा तुमचे पुरुष मित्र/महिला मित्र कोणा दुसऱ्याकरिता तुम्हाला सोडून जातात तेव्हा ?
ठिक आहे, विचार करा की या परिस्थितीत तुम्ही न रागावता किंवा विरोध न करता जशी ती
परिस्थिती आहे त्या स्थितीतच त्याचा स्वीकार कराल. त्या वेळेसही तुम्हाला तितक्याच वेदना होतील? शेवटी, तुमच्या शेजाऱ्याने गाडी खरेदी करण्यात असे काही नाही ज्याला तुम्ही आयुष्यभराचे दु:ख मानाल. जेव्हा तुमच्या प्रिय व्यक्तीशी दुरावा होतो त्या क्षणी वेदना झाली तरी तुम्ही विसरून जाल.
त्या क्षणाच्या अनिवार्यतेचा व स्वागत करण्याचा प्रयत्न करा. एखाद्या अनुभवाचे नकारात्मक उत्तर आपल्याला वेदना देण्याची परवानगी देतो. कोणीही वा कोणतीही बाब तुमच्या मौन स्वीकृतीशिवाय तुम्हाला दु:ख पोहोचवू शकत नाही, हे तुम्ही पाहू शकत नाही का ?
आपल्या व्यक्तिगत मूल्यांकनाशिवाय अनुभवांचा सामना करण्याची सवय करा. आपल्या दु:खाच्या कारणांना स्पष्टपणे ओळखण्यास शिका - जा.
जे स्पष्ट दिसू शकेल व जे अस्पष्टही असेल तेसुद्धा. अर्थात हे करण्याची क्षमता एका दिवसात नाही, परंतु अभ्यासाने जरूर येईल.
कष्टाचे एक खोलवर लपलेले कारण हे असू शकते की - कदाचित तुम्ही त्याचा आस्वाद घेत आहात. उदाहरणार्थ, आजारी पडण्याने तुमच्याकडे लक्ष दिले जाऊन तुमची सेवा केली जात असेल तर आजारी पडणे आनंदित होण्याचा एक स्रोत असू शकतो. परीक्षण करा की कधी
कधी स्वतःला किंवा दुसऱ्याला वेदना देण्याचा आनंद इतका आनंददायक का आहे? या दु :खाशिवाय - हाच आनंद प्राप्त करण्याचा आणखी चांगला मार्ग आहे काय ? सावध बना - ही पहिली पायरी आहे.
दुसरी आहे इथल्या व तिथल्या वस्तुस्थितीस कोणत्याही प्रश्नाशिवाय पूर्णतः स्वीकारा. हो, कारण विकासाकरिता वेदना ही एक शक्तिशाली उत्प्रेरक आहे. ज्याप्रमाणे एक झाड उगविणे व फुलण्यासाठी एक बीज फुटावे लागते त्याप्रमाणेच प्रचंड वेदना अहंकाराच्या भिंती भेदून टाकू शकतात, तेही तुमचे अस्तित्व मोकळे व असुरक्षित सोडून. तुमच्या चक्काचूर झालेल्या चिंतांसहित तुम्ही या सर्व गोष्टी अशा प्रकारे जणू बघू लागता की त्या वास्तवातही आहेत. तुम्ही वेदना व तुमच्या मध्ये असलेले सूक्ष्म अंतर ओळखू लागता - हेच की वेदना तुमची नाही आहे, जे काही आहे ते तुमच्यात अंतर्निहित आहे. एकदा का तुम्ही हे बघू शकलात तर पुढे दु:ख कसे काय होईल ? चेतन अवस्थेत तुम्ही वेदना स्वीकारून, तुम्ही खरोखरीच ती त्यागता.
दु:ख निश्चितच परमसुखाची ठेव नाही. परंतु तुम्ही जर तुमची शिकवण नीट प्रकारे लक्षात ठेवाल, तर दु:ख निश्चितच दुःखाच्या अवास्तविकतेसमोर तुमचे डोळे उघडविते.
हे तुम्हाला शिकवू शकते की दुःख प्राप्त होणे किती अनावश्यक आहे. यालाच मी आवश्यक कष्ट म्हणतो.
प्रश्न : तुम्ही म्हणता की वेदनेचा त्याग परमसुख आणू शकतो - परंतु परमसुखसुद्धा जेव्हा त्याचा शेवट होतो तेव्हा आपल्याला वेदनेच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो. कशा प्रकारे मी वेदनेतून परमसुखाच्या दिशेने जाईन ?
तुम्हाला सर्वात आधी हे ओळखायला हवे की, वेदना व परमसुख या बाबी विपरीत नाहीत. परमसुखाचा वेदनेशी काहीही संबंध नाही. वेदनेच्या विपरीत आहे सुख - आणि सर्व विरोधाभासांप्रमाणेच एकमेकांशिवाय त्यांचे काहीही अस्तित्व नाही. योग्यच म्हटले आहे की वेदनेचा अनुभव घेतल्याशिवाय सुखाची किंमत मिळत नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्राचीन हिंदू धार्मिक ग्रंथांमध्ये केवळ दु:ख शब्दाचाच प्रयोग दु:ख व सुख दोन्हींकरिता होत असे -कारण दोन्हींकरिता शेवटचा परिणाम म्हणजे वेदनाच होती. आपल्याला या दोन्ही गोष्टी एकत्रच त्यागाच्या लागतील दुसरा कोणताही मार्ग नाही. परम आनंद तेव्हा मिळतो जेव्हा तुम्ही सुख-दु:खापासून दूर होता. परमसुख हे वेदना व सुख या दोन्हींपासून अलिप्त आहे. हा एक योग्य समतोल आहे, संपूर्ण आतील, निःशब्दता, पूर्ण शांती.
तुम्ही मला ओळखू शकलात काय ?
★★★★
आज THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM यांचे व्यक्तिमत्त्व जगभरच्या लाखो अनुयायांकरिता प्रेरणा आहे. त्यांनी आपल्या खऱ्या अनुभवांच्या आधारे परमानंद प्राप्तीची पद्धती बनविली व प्रत्येक व्यक्तीला भेट दिली.
त्यांची पद्धत आपल्याला शारीरिक व मानसिकद्रष्ट्या निरोगी सखोल आध्यात्मिक शक्ती देते. जगभरातील लाखो जणांनी त्यांच्या तंत्राद्वारे थोड्याशा कालावधीत अभूतपूर्व परिवर्तनाचा अनुभव घेलता आहे.
ते असे साधन देतात ज्याद्धारे बुद्धी वा प्रतिभेच्या द्वारे नव्हे तर अंतर्द्रष्टी व अभिज्ञतेद्वारे संकिय व रचनात्मक जीवन जगण्याचा निर्देश मिळतो. बाह्य जगात श्रेष्ठता व आंतरिक जगात आलोक आणण्याचा मार्ग ते एकाच वेळी दाखवतात. त्यांचे कार्यक्रम व्यक्तीला सहजपणे भजन-प्रार्थनेत लीन व्हावयास शिकवतात.
THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM म्हणतात, या भौतिक जगात यशाची गुरुकिल्ली म्हणजेच ध्यान आहे. तुमच्या आंतरिक जगात ते तुम्हाला खोलवर संतोष देते. त्यांच्या ध्यानाच्या कार्यक्रमात जे शक्तिशाली तंत्र व प्रणाली आहे ती व्यक्तीची चेतना काही काळाकरिता का होईना फुलित व प्रस्फुटित होण्यास सहयोग करते.
THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM जगभरचे वैज्ञानिक तथा संशोधनात व्यस्त असणाऱ्यांबरोबर काम करून वैज्ञानिक सामग्रीच्या आधारे रहस्यमय घटनांना लिपिबद्ध करीत आहेत. ते स्वतः आपल्या स्नायविक व्यवस्थेत वैद्यकीय विज्ञानाचे जगत क्रूतुहलाने भारून टाकतात. या सर्व आश्चर्यकारक अवलोकनापश्चात वैज्ञानिकांना वाटते की, हृदयाचे आजार, कॅन्सर, सांधेदखी, दारूचे व्यसन आदी आजारांचे प्रमाण, त्यांचे वाढणे आदी प्रकार बदलण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.
लाइफ ब्लिस फाऊंडेशन हे ध्यान व परिवर्तनाकरिता संपूर्ण जगभरात पसरलेले THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM यांचे एक आंदोलन आहे. याची स्थापना सन २००३ मध्ये झाली. तेव्हापासून आतापर्यंत तेहतीस देशांमध्ये एक हजार केंद्रांतुन ही संस्था व्यक्तीमध्ये परिवर्तन करून मानवतेच्या जीवनात परिवर्तन करीत आहे.
Sacred Banyan Tree, Bidadi Ashram, Bharat.
THE SUPREME PONTIFF OF HINDUISM BHAGAWAN SRI NITHYANANDA PARAMASHIVAM मेडिटेशन अकादमी (एन एम ए) जगभरात आध्यात्मिक प्रयोगशाळांप्रमाणे कार्य करीत आहे जेथे आंतरिक विकास सखोल आहे आणि बाह्य विकास एक सहज परिमाण आहे. या अकादमी पवित्र वटवुक्ष, बिडदी आश्रम, भारत या ठिकाणी व स्थानाच्या स्वरूपात दिसन येतात, जेथे ध्यानापासुन विज्ञानापर्यंत अशी कार्ये केली जातात, जे निरंतर शोध व प्रस्फुटटनात कार्यरत असतात.
ढात्ररतो. यो थो Ashram, Bharat चो तानों च्या सखोलतेने संकिय बुद्धीचे सुजन होते.
कोलंबस आश्रम, ओहिओ, यू. एस. ए. पसरलेल्या मानवतेची विविध क्षेत्रांमध्ये सेवा केली जाऊ शकेल.
संस्थाद्वारे जगभरात विविध प्रकारचे भजन-प्रार्थना कार्यक्रम केले जातात तसेच सामाजिक सेवा उपक्रमसुद्धा राबविले जातात.
रोगहरण व्यवस्थेद्वारे गरजूंना नित्य हीलिंग पुरविली जाते. युवकांना मोफत शिक्षण, कला व संस्कृतीकरिता प्रोत्साहन, सत्संग, व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रम, मोफत वैद्यकीय शिबिरे, डोळ्यांच्या शस्त्रक्रिया आदी सुविधा प्रदान केल्या जातात. भारतात निवासी आध्यात्मिक प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत एक वर्षाकरिता निवासी
सालेम आश्रम, भारत
गरुकुल व्यवस्था केली गोली आहे. याद्वारे आनंदेश्वर मंदिराचे गर्भगृह, बिडदी आश्रम जगभरातील मुलांना गुरुकूल पद्धतीने शिक्षण प्राप्त होऊ शकेल. जगभरात आणखीही अनेक सेवा उपलब्ध केल्या गेल्या असुन आणखीही सेवा उपलब्ध केल्या जात आहेत.
लॉस एंजेलेस आश्रमम, यू. एस. ए.
नित्य धीर सेवा सेना (एन डी एस एस) च्या आनंदसेवकांच्या स्वयंसेवक दलात जगभरातील युवक येत आहेत. समर्पित स्वयंसेवकांची संख्या दिवसेदिवस वाढत चालली आहे. मोठ्या उत्साहाने ते मिशानला सहकार्य करीत आहेत.